Sangli News: वडिलांचे दीड वर्षापूर्वी निधन झाले, लहान वयात शेतीची जबाबदारी आली; भाच्याच्या मदतीसाठी मामा आला अन्..
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 12:27 IST2026-05-16T12:26:10+5:302026-05-16T12:27:30+5:30
शेताशेजारी महावितरणचा ट्रान्सफॉर्मर

Sangli News: वडिलांचे दीड वर्षापूर्वी निधन झाले, लहान वयात शेतीची जबाबदारी आली; भाच्याच्या मदतीसाठी मामा आला अन्..
मिरज (जि. सांगली) : आरग (ता.मिरज) येथे शेतात कीटकनाशक फवारणी करत असताना, शुक्रवारी दुपारी एचटीपी पंपाच्या मोटारीतून विजेचा धक्का लागून मामा-भाच्याचा जागीच मृत्यू झाला.
विशाल पांडुरंग माळी (वय २६, रा.आडवा रस्ता, बोलवाड) आणि अथर्व रवींद्र माळी (वय १५, रा.आरग) अशी मृतांची नावे आहेत. विशाल माळी आणि अथर्व माळी हे शुक्रवारी दुपारी वांग्याच्या पिकावर कीटकनाशक फवारणी करत होते. शेताशेजारी महावितरणचा ट्रान्सफॉर्मर असून, एचटीपी पंपाद्वारे औषध फवारणी सुरू असताना मोटारीत विजेचा प्रवाह उतरला, त्यामुळे दोघांना जोरदार शॉक बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अथर्व माळी याच्या वडिलांचे दीड वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यामुळे लहान वयात शेतीची जबाबदारी त्याच्यावर आली होती. शेतात भाच्याच्या मदतीसाठी मामा विशाल माळी आला होता. याबाबत ग्रामीण पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.