शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
5
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
6
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
7
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
8
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
9
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
10
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
11
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
12
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
13
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
15
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
16
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
17
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
18
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
19
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
20
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
Daily Top 2Weekly Top 5

व्यवस्थापकासह तिघांवर गुन्हा

By admin | Updated: September 25, 2014 00:33 IST

जिल्हा बॅँक अपहार : दीड महिन्यापूर्वी प्रकार उघडकीस

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तुंग येथील शाखेत २६ लाख ४६ हजार ७०० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शाखेचे व्यवस्थापक जमीर नसरुद्दीन सनदी (रा. कसबे डिग्रज, ता. मिरज), लिपिक प्रतापराव पांडुरंग धनवडे (रा. बागणी, ता. वाळवा) व शिपाई नंदकुमार रामचंद्र मोरे (रा. कसबे डिग्रज) यांच्याविरोधात आज (बुधवार) सायंकाळी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दीड महिन्यापूर्वी हा अपहार उघडकीस आला होता. तुंग येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत २६ लाख ४६ हजार ७०० रुपयांचा अपहार झाल्याचे बँकेच्या लेखापरीक्षणात उघडकीस आले होते. यानंतर बँक अधिकाऱ्यांनी याची तपासणी करून याला जबाबदार असणाऱ्यांवर ठपका ठेवला होता. त्यानुसार शाखा व्यवस्थापक सनदी, लिपिक धनवडे व शिपाई मोरे यांच्याविरोधात आज बँक अधिकारी फारुक बादशहा फरांडे (रा. पेठभाग, सांगली) यांनी फिर्याद दिली. या तिघांनी गावातील ठेवीदारांकडून रोजची ठेव व कर्जदारांकडून कर्जाचे हप्ते घेतले, मात्र ही रक्कम बँकेत जमा न करता संगनमत करून परस्पर हडप केली. याबाबत ग्राहकांना बोगस नोंदी करून दिल्या. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक पी. डी. जाधव करीत आहेत. (प्रतिनिधी)लाखांचा घोटाळाजिल्हा बँकेच्या तुंग शाखेत लिपिक व शिपायाने गावातील लोकांची देणी भागविण्यासाठी अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर बँकेच्या पथकाने अपहाराची चौकशी केली. २६ लाखांचा अपहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.