शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
2
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
3
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
4
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
5
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
6
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
7
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
8
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
9
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
10
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
11
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
12
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
13
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
14
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
15
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
16
केरळममध्ये भाजपाने खाते उघडले, 'या' मतदारसंघात कमळ फुलले, काँग्रेस, सीपीआयच्या उमेदवारांवर केली मात
17
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
18
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
19
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
20
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णा व्हॅली चेंबरच्या अध्यक्षपदी सतीश मालू

By admin | Updated: May 28, 2015 00:56 IST

संचालकांचा सत्कार : उद्योजकांच्या समस्यांच्या सोडवणुकीचे आश्वासन

कुपवाड : कुपवाड एमआयडीसीमधील कृष्णा व्हॅली चेंबर आॅफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी सतीश मालू यांची, तर उपाध्यक्षपदी पांडुरंग रूपनर आणि रमेश आरवाडे, सचिवपदी चंद्रकांत पाटील यांची बुधवारी निवड करण्यात आली.चेंबरचे गटनेते शिवाजी पाटील, समृध्दी ग्रुपचे प्रमोद मालू, प्रमोद सारडा, उमेश बगाडीया, महावीर मालाणी, अशोक कोठावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडीनंतर सत्काराचा कार्यक्रम झाला.यावेळी शिवाजी पाटील म्हणाले की, कुपवाड एमआयडीसीमधील उद्योजकांच्या औद्योगिक महामंडळाकडे अडकलेल्या अग्निशामन करासह इतर अनेक प्रश्नांची सोडवणूक कृष्णा व्हॅली चेंबरच्या माध्यमातून केली आहे. यापुढेही कुपवाड एमआयडीसीसह येथील उद्योजकांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. कृष्णा व्हॅली चेंबरने यापूर्वीपासून उद्योजकांच्या हितासाठी व चेंबरचा नावलौकिक वाढविण्यासाठी काम केले आहे. संस्थेमध्ये कोणतेही राजकारण केले नाही. चेंबरला गालबोट लागेल, असे कोणतेही कृत्य यापूर्वी केले नाही.उद्योगपती शहाजीराव जगदाळे म्हणाले की, कृष्णा व्हॅली चेंबर ही नावलौकिक मिळविलेली संस्था आहे. याठिकाणी निवडून येणाऱ्यांनी उद्योजकांच्या विकासाबरोबरच उद्योगाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. त्यांना आमचे सहकार्य असेल. प्रकाश चव्हाण म्हणाले की, नूतन संचालक मंडळाने चेंबरमध्ये एकोपा ठेवावा. विरोधकांना बरोबर घेऊन काम करावे. नूतन अध्यक्ष सतीश मालू म्हणाले की, एमआयडीसीमधील सर्व उद्योजकांना बरोबर घेऊन चेंबरचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. याप्रसंगी नूतन अध्यक्ष मालू, उपाध्यक्ष पांडुरंग रूपनर, उपाध्यक्ष रमेश आरवाडे, सचिव चंद्रकांत पाटील, संचालक शिवाजी पाटील, जयपाल चिंचवाडे, गुंडू एरंडोले, रतिलाल पटेल, दीपक मर्दा, अनंत चिमड, विपूल शहा, हरी गुरव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संजय बेडगे, राजू नायकवडी, संजय डोडीया, अजित चिमड, राजेंद्र शेटे, राजू पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)