कानाला फोन, विजयाची बातमी अन् सुहास बाबरांचा ‘खणखणीत शड्डू’; खानापुरात भाजपला क्लीन स्वीप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 17:30 IST2026-02-09T17:29:51+5:302026-02-09T17:30:32+5:30

खानापूरमध्ये सुहास बाबर यांच्या नेतृत्वात शिंदेसेनेने भाजपला क्लिन स्विप दिला आहे.

Sangli Khanapur ZP Election Result Suhas Babar Wins All 4 ZP and 8 Panchayat Samiti Seats | कानाला फोन, विजयाची बातमी अन् सुहास बाबरांचा ‘खणखणीत शड्डू’; खानापुरात भाजपला क्लीन स्वीप

कानाला फोन, विजयाची बातमी अन् सुहास बाबरांचा ‘खणखणीत शड्डू’; खानापुरात भाजपला क्लीन स्वीप

Sangli Khanapur ZP Election Result:सांगली जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या खानापूर-विटा तालुक्यात आमदार सुहास बाबर यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. खानापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीत सुहास बाबर आणि अमोल बाबर या जोडीने भाजपच्या दिग्गज नेत्यांना धूळ चारली आहे. प्रचारादरम्यान माझ्यासारखे २४२ आमदार आहेत म्हणून मुख्यमंत्री आहे, जाऊन विचारा... अशी टीका सुहास बाबर यांनी केली होती. त्यानंतरही सुहास बाबर यांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत शिंदेसेनेचा मोठा विजय मिळवून दिला आहे.

खानापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व ४ जागा आणि पंचायत समितीच्या सर्व ८ जागा जिंकून शिवसेना शिंदे गटाने ऐतिहासिक क्लीन स्वीप दिला आहे. या निकालाने केवळ खानापुरातच नव्हे, तर संपूर्ण सांगली जिल्ह्यात सुहास बाबर यांची पकड मजबूत झाली आहे. नागेवाडी जिल्हा परिषद गटातून आमदार बाबर यांच्या वहिनी डॉ. शीतल बाबर यांनी मिळवलेला विजय मोठा मानला जात आहे.

विरोधकांना चपराक

भाजपचे वैभव पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांसारख्या मातब्बर नेत्यांनी संपूर्ण ताकत लावूनही बाबरांचा गड अभेद्य राहिला. विजयाचे आकडे स्पष्ट होताच आमदार सुहास बाबर यांनी विटा शहरात शड्डू ठोकून जल्लोष केला. सुहास बाबर यांचा विजयाचे सेलीब्रेशन करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओमध्ये बाबर कानाला मोबाईल लावून निकाल ऐकत होतं. विजयाची बातमी कळताच त्यांना आक्रमकपणे शड्डू ठोकून जल्लोष केला. बाबर यांच्या कृतीतून विजयाची खात्री होताच कार्यकर्त्यांनीही जल्लोष केला.

दरम्यान, कोणत्याही मोठ्या स्टार प्रचारकाशिवाय सुहास बाबर आणि विट्याचे उपनगराध्यक्ष अमोल बाबर या बंधूंनी ही निवडणूक लढवली. आटपाडी निंबवडे गटात तर भाजपच्या माधवी पडळकर विजयी झाल्या. 
 

Web Title : खानापुर में सुहास बाबर की जीत: बीजेपी का सफाया।

Web Summary : सुहास बाबर की शिंदे सेना ने खानापुर जिला परिषद और पंचायत समिति चुनावों में बीजेपी को हराकर क्लीन स्वीप किया। बाबर ने जोरदार जीत का जश्न मनाया, जो एक महत्वपूर्ण जीत है। उनकी भाभी डॉ. शीतल बाबर भी जीतीं।

Web Title : Suhas Babar's victory in Khanapur: BJP faces clean sweep.

Web Summary : Suhas Babar's Shinde Sena secured a clean sweep in Khanapur Zilla Parishad and Panchayat Samiti elections, defeating BJP. Babar celebrated the victory emphatically, marking a significant win. His sister-in-law, Dr. Sheetal Babar, also won.