शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
4
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
5
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
6
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
7
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
8
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
9
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
10
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
11
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
12
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
13
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
14
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
15
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
16
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
17
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
18
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
19
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
20
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत १३ रोजी पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सव, जागतिक किर्तीच्या दिग्गज कलाकारांचा आविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 14:26 IST

स्वरवसंत ट्रस्टतर्फे चौथा स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सव येत्या १३ जानेवारीस सांगलीत आयोजित केला आहे. जागतिक किर्तीच्या अनेक दिग्गज कलाकारांच्या आविष्काराने महोत्सव रंगणार आहे, अशी माहिती संयोजक बाळासाहेब कुलकर्णी व मिलिंद कुलकर्णी यांनी दिली. ​​​​​​​

ठळक मुद्दे कै. पं. वसंतराव गुरव संवादिनी वादक पुरस्कार पं. रवींद्र काटोटी यांना ८९ वषींय माऊली टाकळकर यांचाही विशेष सत्कार करण्यात येणार सांगलीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात १३ जानेवारीस महोत्सव

सांगली : स्वरवसंत ट्रस्टतर्फे चौथा स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सव येत्या १३ जानेवारीस सांगलीत आयोजित केला आहे. जागतिक किर्तीच्या अनेक दिग्गज कलाकारांच्या आविष्काराने महोत्सव रंगणार आहे, अशी माहिती संयोजक बाळासाहेब कुलकर्णी व मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.सांगलीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात १३ जानेवारीस सकाळी साडे आठ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत दोन सत्रात हा महोत्सव होईल. सकाळच्या पहिल्या सत्रात साडे आठ वाजता सांगलीतील रफीक नदाफ, शफात नदाफ यांचे सतारवादन, पुण्याचे संदीप रानडे यांचे शास्त्रीय गायन आणि बंगळुरूचे डॉ. रविंद्र काटोटी यांचे एकल हार्मोनियम वादन होणार आहे.

दुसऱ्या सत्रात मुंबईच्या मानसकुमार यांचे व्हायोलियन वादन, बंगळुरूचे पं. प्रवीण गोडखिंडी यांचे बासरीवादन आणि त्यानंतर रात्री पं. संजीव अभ्यंकर आणि विदुषी डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या जसरंगी जुगलबंदीने महोत्सवाची सांगता केली जाणार आहे.

या कार्यक्रमात कै. पं. वसंतराव गुरव संवादिनी वादक पुरस्कार पं. रवींद्र काटोटी यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच पंडित भीमसेन जोशी यांच्यासोबत ५0 वर्षाहून अधिक काळ टाळवादक म्हणून साथसंगत केलेले ८९ वषींय माऊली टाकळकर यांचा विशेष सत्कारही यावेळी करण्यात येणार आहे.

महोत्सवात हार्मोनियमवर सुयोग कुंडलकर,मिलिंद कुलकर्णी, तर तबलासाथ अजिंक्य जोशी, महेश देसाई, यशवंत वैष्णव व रोहित मुजुमदार देणार आहेत. कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका संयोजकांनी ठिकठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत. 

टॅग्स :Sangliसांगलीmusicसंगीत