भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्काराने माणिक भिडे यांचा गौरव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 05:28 AM2018-01-10T05:28:41+5:302018-01-10T10:58:41+5:30

​ज्येष्ठ शास्त्रीय गायिका माणिक भिडे या खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या माणिक आहेत. त्यांना प्रदान करण्यात येणारा भारतरत्न पंडित भिमसेन जोशी ...

Bharat Ratna Pt. Pride of Manik Bhide of Bhimsen Joshi Classical Music Life Care Award | भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्काराने माणिक भिडे यांचा गौरव

भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्काराने माणिक भिडे यांचा गौरव

googlenewsNext
्येष्ठ शास्त्रीय गायिका माणिक भिडे या खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या माणिक आहेत. त्यांना प्रदान करण्यात येणारा भारतरत्न पंडित भिमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार म्हणजे महाराष्ट्राचा गौरव आहे, असे गौरव उद्गार सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. विनोद तावडे यांनी आज काढले.

सांस्कृतिक संचालनालयातर्फे प्रतिवर्ष भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीतासाठी दिला जाणारा यंदाचा पुरस्कार पं. अरविंद परिख यांच्या हस्ते ज्येष्ठ गायिका माणिक भिडे यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. विनोद तावडे, पं. केशव गिंडे, पं. नाथ नेरुळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या भाषणात श्री. तावडे म्हणाले की, आकाशवाणीच्या प्रत्येक कार्यक्रमात माणिकताईंचे सुर आम्ही ऐकले आहेत. आज त्यांना गौरविण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार म्हणजे महाराष्ट्राचा गौरव आहे. नजिकच्या काळात शास्त्रीय संगीत व संगीत नाटकांची उच्च परंपरा कशी पुढे नेता येईल, याचा कृती आराखडा बनविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. नवीन पिढीमध्ये राष्ट्रीय संगीताची आवड आणि गोडी रुजविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असेही श्री. तावडे यांनी सांगितले.

२०१९ मध्ये बाबुजी सुधीर फडके, गदिमा व पुल देशपांडे या महान व्यक्तींचे जन्मशताब्दी वर्ष येत आहे, हे जन्मशताब्दी वर्ष नियोजनबद्ध पध्दतीने साजरे करण्याच्यादृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे, असे सांगून श्री. तावडे म्हणाले की या जन्मशताब्दी वर्षामध्ये फक्त उत्सव साजरे करायचे नसून, नवीन पिढीमध्ये किमान २५ संगीतकार कवी, गायक, साहित्यिक निर्माण करावयाचे आमचे उद्दीष्ट आहे.

महाराष्ट्रातील नव्या पिढीच्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्यादृष्टीने महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामाची स्थापना गेल्यावर्षी करण्यात आली. या स्कूल ऑफ ड्रामामध्ये २५ जागा असल्या तरीही येथे प्रवेश मिळविण्यासाठी दुप्पट अर्ज आले. आता या स्कूल ऑफ ड्रामाचा अभ्यासक्रम पूर्ण होत असून लवकरच महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा मधून २५ विद्यार्थी यशस्वीपणे बाहेर पडतील, असेही श्री. तावडे यांनी सांगितले.

यावेळी जीवनगौरव पुरस्कार विजेत्या माणिक भिडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि म्हणाल्या आज आपल्याला मिळालेला पुरस्कार वैयक्तिक नाही तर गुरुंचा आशीर्वाद आहे. संगीत क्षेत्रात गुरु-शिष्याची परंपरा आजही कायम असून माझा गौरव म्हणजे गुरु शिष्य परंपरेचा गौरव आहे. नवी पिढी शास्त्रीय संगीताकडे वळत असून शास्त्रीय संगीतामध्ये संगीतसाधक व्हायचे असेल तर गुरु शिष्य परंपरा जोपासली पाहीजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. आज सोशल मिडीयाच्या जमान्यात संगीताचा गाभा सर्वांना जपायचा आहे. त्याचे भान सर्वांनी राखायचे आहे असे मतही त्यानी व्यक्त केले.

Web Title: Bharat Ratna Pt. Pride of Manik Bhide of Bhimsen Joshi Classical Music Life Care Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.