शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
4
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
5
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
6
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
7
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
8
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
9
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
10
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
11
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
12
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
13
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
14
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
15
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
16
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
17
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
18
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
19
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
20
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेतील ‘घरपट्टी’च्या निवृत्त लिपिकाकडे ३५ लाखांची बेहिशेबी मालमत्ता, चौकशीत निष्पन्न

By घनशाम नवाथे | Updated: June 18, 2025 17:20 IST

लाचखोरीच्या चौकशीत निष्पन्न

घनशाम नवाथे 

सांगली : महापालिकेतील घरपट्टी विभागातील निवृत्त लाचखोर कर्मचारी नितीन भिमराव उत्तुरे (वय ६३, रा. सांगलीकर मळा, मिरज) याने सेवा काळात १९ वर्षात ३५ लाख १६ हजार १९२ रूपयांची बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत निष्पन्न झाले. उत्तुरे याच्यासह त्याला प्रोत्साहन देणारी पत्नी वंदना उत्तुरे या दोघांविरूद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

महापालिकेतील घरपट्टी विभागात लिपिक पदावर कार्यरत असताना नितीन उत्तुरे याने २०१९ मध्ये घरपट्टी कमी करण्यासाठी ३ हजार रूपयांची लाच घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तेव्हा सापळा रचून त्याला अटक केली होती. मिरज शहर पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला होता. लाचखोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर उत्तुरे याच्या मालमत्तेची चौकशी सुरू होती.

नितीन उत्तुरेसह पत्नीवर गुन्हा दाखल

उत्तुरे याने या काळात तब्बल ३५ लाख १६ हजार १९२ रूपयांची मालमत्ता भ्रष्ट कारभारातून मिळवली. त्यासाठी पत्नी वंदना उत्तुरे हिने प्रोत्साहन दिले असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक विनायक भिलारे यांनी ही चौकशी केली. उपअधीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किशोरकुमार खाडे यांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात बेहिशोबी मालमत्तेबाबत फिर्याद दिली. त्यानुसार नितीन उत्तुरे व पत्नी वंदना उत्तुरे या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अंमलदार सुदर्शन पाटील, प्रीतम चौगुले, अजित पाटील, ऋषिकेश बडणीकर, पोपट पाटील, उमेश जाधव, सलीम मकानदार, रामहरी वाघमोडे, धनंजय खाडे, सीमा माने, चंद्रकांत जाधव, अतुल मोरे, वीणा जाधव, विठ्ठल रजपूत यांचा चौकशी पथकात समावेश होता.                        

बेहिशोबी मालमत्तेची तक्रार करा

जिल्ह्यातील लोकसेवक, शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याबाबत खात्रीशीर माहिती असल्यास त्याबाबत तक्रार द्यावी. तसेच लाचेच्या मागणीबद्दलही टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा ०२३३-२३७३०९५ या क्रमांकावर तक्रार करावी असे आवाहन उपअधीक्षक अनिल कटके यांनी केले.