शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
4
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
5
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
6
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
7
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
8
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
9
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
10
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
11
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
12
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
13
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
14
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
15
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
16
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
17
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
18
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
19
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
20
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका आयुक्त म्हणतात... माझी बदली करा !

By admin | Updated: May 27, 2015 00:58 IST

नगरसेवक, पदाधिकाऱ्यांशी वाद : एलबीटीची वसुली थंडावल्याने पगार, खर्च भागविणे जिकिरीचे

सांगली : महापालिकेचे आयुक्त अजिज कारचे सातत्याने बदलीचा इशारा देत आहेत. नगरसेवक, पदाधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी त्यांच्याकडे समस्या, तक्रारी घेऊन गेले की, ‘मला येथून घालवा’, अशी एकच मागणी ते करीत असतात. या प्रकारातून मंगळवारी नगरसेवक गौतम पवार व कारचे यांच्यात जोरदार वादावादी झाली. पालिकेचा आर्थिक गाडा रुतला असून हरित न्यायालयाच्या कारवाईची टांगती तलवार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा प्रमुख असलेला कर्णधारच गलितगात्र होत असल्याने नगरसेवकांतून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. एलबीटीची वसुली थंडावल्याने कर्मचाऱ्यांचे पगार, दैनंदिन खर्च भागविणेही जिकिरीचे झाले आहे. त्यातच नगरसेवकांकडून विकास कामांसाठी प्रशासनावर दबाव वाढला आहे. आयुक्त कारचे यांनी विकास कामांचा प्राधान्यक्रम निश्चित केला आहे. तातडीच्या कामांना प्राधान्य देताना, कमी महत्त्वाच्या कामांच्या फायली त्यांनी थांबविल्या आहेत. यातूनच नगरसेवकांत समज-गैरसमज पसरू लागले आहेत. नगररचना विभागाकडील फायलींचा तत्परतेने होणार निपटारा या साऱ्या प्रकारामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर नगरसेवकांना संशय आहे. या प्रकारातून आयुक्त व नगरसेवकांत वादावादीचे प्रसंग घडू लागले आहेत. मंगळवारी स्वाभिमानी आघाडीचे नगरसेवक गौतम पवार, बाळू गोंधळी यांनी आयुक्तांना विकास कामांचा जाब विचारला. गोंधळी यांच्या प्रभागातील दोन कामांच्या फायली आयुक्त कार्यालयाकडे पडून आहेत. त्याला मंजुरी मिळत नाही. इतर नगरसेवकांच्या फायली मात्र निकाली निघत आहेत, असा त्यांचा सूर होता. त्यातून वादावादीला सुरूवात झाली. पवार व कारचे दोघेही एकेरीपर्यंत पोहोचल्याची चर्चा पालिकेत होती. त्यावर वैतागलेल्या आयुक्तांनी ‘आता बदली करून जातो’, असा सूर आळवला. गौतम पवार यांनीही ‘बदलीसाठी शासनाकडे जा, आम्ही आयुक्तांच्या खुर्चीला महत्त्व देतो, तेथे कोण बसले आहे, हे पाहत नाही’, असा संताप व्यक्त केला. आयुक्तांनी ‘माझी बदली करा, केवळ मलाच टार्गेट केले जाते’, असे म्हणताच पवार यांनी, ‘टार्गेट काय असते ते माजी जिल्हाधिकाऱ्यांना विचारा’, असा टोला लगावला. (प्रतिनिधी)चाळीस कोटी भरण्याचे आव्हानहरित न्यायालयाने ४० कोटी रुपये भरण्याचे निर्देश दिले आहेत. पण तिजोरीत खडखडाट असताना निधीच्या उभारणीचे आव्हान प्रशासनासमोर आहे. ड्रेनेजच्या ठेकेदाराला अदा केलेली बिले, नगररचना विभागाकडील फायलींचा तत्परतेने होणार निपटारा या साऱ्या प्रकारांमुळे प्रशासनाच्या भूमिकेवर नगरसेवकांना संशय आहे.