सांगलीतील जलतरण केंद्रात बुडून मुंबईच्या तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 12:33 IST2026-05-11T12:30:29+5:302026-05-11T12:33:13+5:30

अम्मार शेख हा मुंबईचा तरुण काही दिवसांपासून गणेशनगर येथील मशिदीमध्ये राहण्यास आला होता

Mumbai youth dies after drowning at swimming center in Sangli | सांगलीतील जलतरण केंद्रात बुडून मुंबईच्या तरुणाचा मृत्यू

सांगलीतील जलतरण केंद्रात बुडून मुंबईच्या तरुणाचा मृत्यू

सांगली : येथील गणेशनगरमध्ये रोटरी क्लबच्या रामभाऊ भिडे जलतरण केंद्रात रविवारी दुपारी झालेल्या गर्दीमध्ये पोहताना अम्मार असीफ शेख (वय २८, रा. अंधेरी वेस्ट, मुंबई) या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा नोंद करण्यात आली. 

अम्मार शेख हा मुंबईचा तरुण काही दिवसांपासून गणेशनगर येथील मशिदीमध्ये राहण्यास आला होता. रविवारी दुपारी उकाडा खूप असल्यामुळे मित्रांबरोबर तो पोहण्यासाठी जवळच असलेल्या जलतरण केंद्रात गेला. दुपारी तीनच्या सुमारास तो मित्रांबरोबर तलावात पोहत होता. रविवारची सुटी असल्यामुळे पोहण्यासाठी गर्दी झाली होती. क्षमतेपेक्षा जास्त मुले तलावात उतरली होती. 

पावणे चार ते चारच्या सुमारास अम्मारबरोबर आलेले मित्र तलावातून बाहेर आले. त्यांना अम्मार दिसला नाही. त्यामुळे त्यांनी आजूबाजूला गर्दीत शोध घेतला. तो आढळून आला नाही. त्यामुळे सर्वत्र शोध घेताना तो तलावात बुडाल्याचे दिसून आले.

Web Title : सांगली के स्विमिंग पूल में डूबने से मुंबई के युवक की मौत; भीड़भाड़ का संदेह

Web Summary : सांगली के गणेश नगर स्विमिंग पूल में भीड़भाड़ के कारण मुंबई के 28 वर्षीय निवासी की डूबने से मौत हो गई। मुंबई से आए अम्मार आसिफ शेख दोस्तों के साथ तैर रहे थे तभी यह घटना हुई। राम भाऊ भिडे स्विमिंग सेंटर में उसकी मौत के आसपास की परिस्थितियों की पुलिस जांच कर रही है।

Web Title : Mumbai Youth Drowns in Sangli Swimming Pool; Overcrowding Suspected

Web Summary : A 28-year-old Mumbai resident drowned in Sangli's Ganesh Nagar swimming pool due to overcrowding. Ammar Asif Sheikh, visiting from Mumbai, was swimming with friends when the incident occurred. Police are investigating the circumstances surrounding his death at the Ram Bhau Bhide swimming center.