शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, दिवाळीच्या फराळातून ३ हजार रुपये वाटल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 09:15 IST

Maharashtra Assembly Election 2024 : याप्रकरणी आता निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त भरारी पथकाने कारवाई केली आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : सांगली : राज्यभरात दिवाळीसह विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे.विविध पक्षांचे उमेदवार मतदारांना घरोघरी भेटी देऊन दिवाळीच्या शुभेच्छा, तसेच फराळ देत आहेत. अशातच तासगाव शहरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना पैसे आणि दिवाळीचा फराळ वाटल्याचा आरोप अजित पवार गटाचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केला होता. 

याप्रकरणी आता निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त भरारी पथकाने कारवाई केली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे दोन कार्यकर्ते सचिन उर्फ बाबजी गणपतराव पाटील आणि बाबासाहेब उर्फ खंडू निवृत्ती कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदारांना पैसे आणि दिवाळीचा फराळ वाटप करत आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

काल तासगाव येथील साठे नगर भागात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पाटील यांची पदयात्रा सुरू होती. या पदयात्रेच्या पाठीमागे रोहित पाटलांचे काही कार्यकर्ते फराळाच्या बॉक्समधून पैसे वाटत असताना निदर्शनास आले. यानंतर संजय काका पाटलांच्या कार्यकर्त्यांनी या रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांना पकडून पोलीस ठाण्यात आणले. 

याप्रकरणी चौकशी केली असता रोहित पाटलांच्या या कार्यकर्त्यांनी मतदारांना फराळाचा एक बॉक्स आणि तीन हजार  रुपयांचे आमिष दाखवून आदर्श आचारसंहितेचा भंग केला . त्यामुळे तासगाव पोलिसांनी पूर्ण चौकशी व तपास करून रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांविरोधात फिर्याद दाखल करून घेतली. या प्रकरणी आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Rohit Patilरोहित पाटिलtasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळSangliसांगली