शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरेंना मिळाली, तर शरद पवार पाठिंबा देतील - संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 13:15 IST

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्राला पंतप्रधान पदाचा मान का मिळू नये, असा थेट सवालही संजय राऊत यांनी केला.

Sangli Lok Sabha Election 2024: सांगली : उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांच्या पंतप्रधानपदासाठी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा समर्थन केले. सांगलीत मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा अर्ज भरल्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत, याचा निर्णय इंडिया आघाडीत बसून घेतला जाईल. शरद पवार यांचे कर्तृत्व असताना त्यांना हे पद मिळले नाही. उद्धव ठाकरे यांनी उत्तम काम केले आहे. आमच्याकडे जास्त चेहरे आहेत. मोदी एके मोदी नाही. पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरे यांना मिळाली तर शरद पवार पाठिंबा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, महाराष्ट्राला पंतप्रधान पदाचा मान का मिळू नये, असा थेट सवालही संजय राऊत यांनी केला.

देशात इंडिया आघाडीला लोकसभा निवडणुकीत 300 पेक्षा जास्त जागा मिळतील, तर राज्यात 35 पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जमा होतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसेच, दूरदर्शन हे भाजपा प्रणित झाले आहे, अशी टीका त्यांनी केली. लोगो भगवा झाला म्हणून हिंदुत्वव उजळून निघाला असे नाही, असा चिमटा त्यांनी काढला. अजित पवार यांचा एकही खासदार निवडून येणार नाही, भविष्यात ते भाजपात विलीन होईल, असा टोला संजय राऊत यांनी हाणला. तर बारामतीमधून सुप्रिया सुळे या बहुमताने निवडून येतील असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

विशाल पाटील आमचे शत्रू नाहीत - संजय राऊतअर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते. विश्वजित कदम तब्येत ठीक नसल्याने उपस्थित राहू शकले नाहीत, पण पुढील सभेला विश्वजित कदम दिसतील. विशाल पाटील हे समजुतदार आहेत, वसंतदादा पाटील यांच्या क्रांतिकारक कुटुंबातील आहेत. विशाल पाटील आपल्या क्रांतीकारक आजोबांच्या विचारांपेक्षा वेगळी भूमिका घेणार नाहीत.विशाल पाटील यांच्याशी आमचा यावेळेला उत्तम संवाद आहे. वसंतदादा आणि बाळासाहेब ठाकरे यांचे घनिष्ठ संबंध होते. विशाल पाटील आमचे शत्रू नाहीत, ते आमच्या कुटुंबातील आहेत. उद्धव ठाकरे यांचे विशाल पाटील यांच्यावर प्रेम असूनही त्यांचेही असल्याचे संजय राऊत म्हणाले.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४SangliसांगलीUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवार