शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
4
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
5
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
6
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
7
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
8
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
9
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
10
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
11
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
12
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
13
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
14
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
15
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
16
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
17
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
18
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
19
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
20
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
Daily Top 2Weekly Top 5

युवकाचे अपहरण; तिघे जाळ्यात

By admin | Updated: May 27, 2015 00:57 IST

पोलीस कोठडीत रवानगी : सूत्रधारासह दोघे फरारी; नगर जिल्ह्यातील टोळी इस्लामपुरात सक्रिय

इस्लामपूर : सोने देण्याचे आमिष दाखवून इस्लामपुरातून अपहरण केलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची सुटका करण्यासाठी पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या नगर जिल्ह्यातील तिघांची पोलीस कोठडीत रवानगी झाली. यातील अन्य दोघे अद्याप फरारी आहेत. उध्दव अंजाबा गीते (वय २६, रा. डोंगरवाडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), तौफिक जमील देशमुख (२१, नांदगाव, जि. अहमदनगर) व किशोर ज्ञानदेव सरोदे (२७, रा. वाघोली, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मुख्य सूत्रधार विजय कोळी (रा. रेठरेधरण) व अनिल गवते (अहमदनगर) हे फरारी आहेत. या सर्वांविरुध्द पोलिसात अपहरण, खंडणी व बेकायदा अग्निशस्त्र बाळगल्यावरून गुन्हा नोंद झाला आहे. या सर्वांनी दिग्विजय संजय खांबे (२०, रा. यल्लम्मा चौक, इस्लामपूर) याचे १९ मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास अपहरण केले होते. अपहरणकर्त्यांनी गुन्ह्यात रिव्हॉल्व्हर, मोटारीसह (क्र. एमएच १६-ए टी— ८३३) दुसऱ्या एका मोटारीचा वापर केला होता. याप्रकरणी अपहरण झालेल्या दिग्विजय खांबे याची बहीण शीतल बाळकृष्ण पवार (२२, रा. इस्लामपूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. अपहरण झालेला दिग्विजय हा पेठ येथील पॉलिटेक्निकमध्ये द्वितीय वर्षात शिकत आहे. रेठरेधरण येथील विजय कोळी याच्याशी त्याची ओळख झाली होती. त्यातून कोळी हा अवैध धंदे करीत असल्याची माहिती दिग्विजयला मिळाल्यावर त्याने त्याच्याकडे कामाची मागणी केली. कोळी याने त्याला सोने देण्याचा बहाणा करून सोबत घेतले. पुण्यात गेल्यावर नगर जिल्ह्यातील चौघांनी त्याला ताब्यात घेतले. पुण्यातून कोळी हा निघून आला. नगरमध्ये गेल्यावर दिग्विजयला आपले अपहरण करण्यात आल्याची जाणीव झाली. यादरम्यान दिग्विजयच्या नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू ठेवला होता. पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी सौ. पवार यांच्या मोबाईलवरच अपहरणकर्त्यांशी संपर्क साधून बोलणी सुरू ठेवली. ‘५ लाख द्या, नाही तर मुलास ठार मारेन’ अशी धमकी त्यांनी दिली. त्यावर तातडीने पोलिसांचे पथक पाठवून वाघोली येथून दिग्विजय खांबे याची सुटका करून तिघांना ताब्यात घेतले. यातील उध्दव गीते व तौफिक देशमुख या दोघांना २७ मेपर्यंत, तर किशोर सरोदे याला २८ मेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. संशयितांनी गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारी व रिव्हॉल्व्हर हस्तगत करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी केली. (वार्ताहर)बहिणीशी संपर्क२१ मे रोजी सकाळी बहिणीच्या मोबाईलवर दिग्विजयने संपर्क साधून, ‘मला कुणीतरी पळवून आणल्या’चे सांगितले. दुपारी पुन्हा त्याचा फोन आल्यावर शीतल पवार यांनी त्याच्या अपहरणाची फिर्याद दाखल केली.