शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
5
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
6
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
7
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
8
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
9
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
10
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
11
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
12
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
13
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
14
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
15
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
16
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
17
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
18
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
19
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
20
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
Daily Top 2Weekly Top 5

जीपचालकाने शाळकरी मुलाचा चाकूने वार करून निर्घृण खून केला

By admin | Updated: May 27, 2015 01:18 IST

उपोषण केले नसते तर...

संख : दागिने व पैशाच्या हव्यासापोटी सिद्धनाथ (ता. जत) येथील फाट्यावर खासगी प्रवासी वाहतुकीच्या (वडाप) जीपचालकाने शाळकरी मुलाचा चाकूने वार करून निर्घृण खून केला. उदयसिंह ऊर्फ सोनू बलराज रूपनर (वय १५, रा. सिद्धनाथ, मूळ गाव निमज, ता. कवठेमहांकाळ) असे मृत मुलाचे नाव आहे. दागिने लुटताना झालेल्या झटापटीत त्याची आई छायादेवी (३५), भाऊ सोमशेखर (१२), बहीण ऋतुजा (१४) गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. खुनानंतर पळून जाणारा२, रा. कैकाडी गल्ली, जत) जीप पलटल्यामुळे पोलिसांच्या हाती लागला.बलराज रूपनर मूळचे निमज येथील असून, जत तालुक्यातील पांढरेवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये ते प्राथमिक शिक्षक आहेत. सिद्धनाथ येथे ते कुटुंबासह राहतात. सोमवारी त्यांचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन होते. आंदोलन करून सांगलीतून रात्री एक वाजता शेवटच्या जत-सांगली गाडीने ते जतमध्ये आले. रात्र झाल्याने त्यांनी विजय माने याच्या मालकीची खासगी प्रवासी वाहतुकीची जीप (एमएच १० के ५१०) भाड्याने ठरवली. बलराज रूपनर यांनी कुटुंबातील सर्वांना जीपमध्ये बसवले आणि ते स्वत: जतमध्ये ठेवलेल्या दुचाकीवरून गाडीपाठोपाठ होते. जीपमध्ये रूपनर कुटुंबातील चौघांसह चालक असे पाचजण होते. मुचंडी ओलांडल्यानंतर बलराज रूपनर गाडीच्या पुढे निघून सिद्धनाथला गेले. सिद्धनाथ फाटा ओलांडून दोनशे मीटर पुढे आल्यावर माने याने जीप बंद पडल्याचे कारण सांगून ती थांबवली. तेथून छायादेवी मुलांसह फाट्याकडे निघाल्या. मात्र त्याचवेळी माने याने छायादेवी यांचे दागिने आणि पैसे लुटण्याच्या हेतूने बेसावध उदयसिंहवर अगोदरच खिशात ठेवलेल्या चाकूने सपासप वार केले. छाती व पोटावर वर्मी घाव बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यावर १४ वार झाले होते. त्याचवेळी उदयसिंहची आई छायादेवी, भाऊ सोमेश्वर आणि बहीण ऋतुजा हिच्यावरही मानेने चाकूने वार केले. छायादेवी आणि सोमेश्वर यांची प्रकृती गंभीर आहे. ही झटापट सुमारे दहा मिनिटे सुरू होती. यावेळी ऋतुजाने पुढे गेलेले वडील बलराज रूपनर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. ते सिद्धनाथमधून घटनास्थळी आले. त्यांची गाडी आलेली पाहून विजय मानेने वेगाने दरीकोणूरमार्गे पलायन केले. मात्र दरीकोणूर-सोरडी रस्त्यावर पाटील वस्तीजवळ जीप पलटी झाली. रूपनर यांनी रात्री दोन वाजता वस्तीवरील लोकांना उठवले. जतला दूरध्वनी करून नातेवाईकांना बोलावून माने याला रुग्णालयामध्ये दाखल झाले. पोलिसांनी तेथून त्याला अटक केली.छायादेवी यांच्या गळ्यामध्ये दागिने होते. शिवाय त्यांची मुलगीही सोबत होती. मानेने वाईट हेतूने हा प्रकार केला असावा, अशीही चर्चा आहे. पोलिसांनी रात्री घटनास्थळी भेट दिली. जखमींना सांगलीला पाठवून दिले. पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे तपास करीत आहेत. (वार्ताहर)शरीराची चाळणविजय मानेने मृत उदयसिंह याच्या छातीवर, पोटावर, मानेवर, पाठीवर, हातावर गंभीर १४ वार केले आहेत. त्याच्या शरीराची चाळण झाली होती. छायादेवी यांचे दागिने घेताना झटापट झाली असावी. यावेळी ऋतुजाने पैशांची पर्स घट्ट पकडून ठेवली होती. आई आणि बहिणीच्या मदतीला आलेला उदयसिंह मध्ये पडल्यावर मानेने वार केले असल्याचा संशय असून, छायादेवी यांच्या जबाबानंतर घटनाक्रम स्पष्ट होणार आहे.उपोषण केले नसते तर...प्राथमिक शिक्षक बलराज रूपनर यांनी कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन केले होते. आंदोलन करून ते उशिरा जतमध्ये आले. वडापच्या गाडीने गावी जाताना मुलाचा खून झाला. उपोषण केले नसते तर जतमध्ये येण्यास त्यांना एवढा उशीर झाला नसता. उपोषणामुळेच हा बळी गेला, अशी चर्चा परिसरात होती.