शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

जयंत पाटील यांच्या ‘बेरजे’ची वजाबाकी?

By admin | Updated: October 17, 2014 22:46 IST

इस्लामपूर मतदारसंघ : निकालानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट

अशोक पाटील - इस्लामपूर -विधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या २४ तासांवर येऊन ठेपला आहे. राज्यातील निकालावरील अंदाजाचे कल भाजप—शिवसेनेच्या बाजूने असले तरी, इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांचा विजय निश्चित असल्याचे मानले जाते. परंतु ते किती मतांची आघाडी घेतात, याचीच आकडेमोड मतदारसंघात सुरु आहे. या त्यांच्या बेरजेच्या राजकारणाला कितपत यश येणार, हे राज्याच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.राजारामबापू पाटील, एन. डी. पाटील आणि विलासराव शिंदे अशी लढत यापूर्वी चांगलीच गाजली होती. यामध्ये काँग्रेसचे विलासराव शिंदे विजयी झाले. परंतु शरद पवार यांनी सर्वच पक्षांना एकत्रित करुन पुलोद सरकार स्थापन केले. निवडणुकीत पराभूत झालेले राजारामबापू पाटील, एन. डी. पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला. याउलट यावेळच्या निवडणुकीची परिस्थिती झाली आहे. जयंत पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असले तरी, त्यांना सत्तेत स्थान मिळणार का यावर प्रश्नचिन्ह आहे.या मतदारसंघात खासदार राजू शेट्टी, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी एकत्र येऊन जयंत पाटील यांच्याविरोधात एकास एक उमेदवार देण्याचा डाव मांडला होता. तो हाणून पाडण्यात जयंत पाटील यशस्वी झाले. यामुळे त्यांना निवडणूक सोपी तर झाली. राज्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला ग्रहण लागल्याने, त्यांना सत्तापद मिळ्ण्याची संधी धूसर होऊ लागली आहे. त्यामुळे सध्या तरी त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद असला तरी, सत्तेत संधी मिळणार नसल्याचे दु:खही त्यांच्या मनात सलत आहे.जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहता, जयंत पाटील यांचे काही समर्थक भाजप-शिवसेनेत सामील झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे सत्तेसाठी शिवसेनेशी हातमिळणी करतील, असाही अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत. असे झाल्यास जयंत पाटील यांना मंत्रीपद मिळेल, अशीही चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांतून आहे.एकंदरीत जयंत पाटील यांच्या विजयाने राष्ट्रवादीच्या खात्यात एका जागेची भर पडणार असली तरी, सत्तेत स्थान मिळाल्याशिवाय या मतदारसंघात आनंदोत्सव साजरा होणार नाही, हे मात्र निश्चित.दुसऱ्या क्रमांकासाठी रस्सीखेच..!जयंत पाटील यांच्याविरोधात दोन माजी जि. प. सदस्यांनी आव्हान देण्याचा प्रयत्न केला. माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील व खासदार राजू शेट्टी यांनी या दोघांमध्ये एकमत घडवून एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न केला. परंतु यामध्ये ते यशस्वी झाले नाहीत. शेवटी अभिजित व जितेंद्र पाटील यांनी पूर्ण प्रतिष्ठा पणाला लावून किमान दुसऱ्या क्रमांकावर येण्याचा प्रयत्न केला. यात कोण यशस्वी होणार, हे १९ तारखेला समजणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये मात्र आमचाच नेता दुसऱ्या क्रमांकावर असेल, यावर पैजाही लागल्या आहेत.