शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: इस्लामपूर-शिराळ्यात राजकीय पक्षांना गटबाजीचे ग्रहण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 19:00 IST

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक चुरशीची होण्याचे संकेत

अशोक पाटीलइस्लामपूर : इस्लामपूर-शिराळा मतदारसंघातील अंतर्गत गटबाजीमुळे राजकीय हवा चांगलीच तापणार आहे. जिथे पक्ष, तिथे नेता अशी अवस्था झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गटनेतेच बेरजेच्या राजकारणासाठी स्वत:च्या अस्तित्वाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळेच कार्यकर्त्यांचा भाव चांगलाच वधारणार आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक चुरशीच्या होण्याची शक्यता आहे.इस्लामपूर मतदारसंघात आमदार जयंत पाटील यांचे आजही वर्चस्व आहे. त्यांचे मताधिक्य घटले असले तरी सहकारी चळवळीत त्यांची ताकद मोठी आहे. त्यामुळेच त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत स्थानिक पातळीवर अंतर्गत गटबाजीच्या राजकारणाचा खेळ नेहमीच चव्हाट्यावर आलेला आहे. याचाच फायदा विरोधकांना होत चालला आहे. सध्या इस्लामपूर मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाची एन्ट्री झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाची माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील, तालुकाध्यक्ष केदार पाटील यांचा नवीनच गट तयार झाला आहे.विक्रम पाटील यांनी पक्षनिष्ठा सांभाळून भाजप पक्षाला तारले आहे. इस्लामपूर मतदारसंघात राहुल महाडिक यांनीही भाजप पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे भाजपमध्येही वेगवेगळे गट आहेत. तर शिंदेसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार आणि हुतात्माचे गौरव नायकवडी यांनीही शिंदेसेनेला ताकद दिली आहे. एकंदरीत इस्लामपूर मतदारसंघात पक्षीय गटबाजीला उधाण आले आहे.शिराळा मतदारसंघात पारंपरिक असे तीन राजकीय गट होते. यामध्ये माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख आणि मानसिंगराव नाईक यांचा समावेश होता तर आता शिराळा मतदारसंघात नव्यानेच महाडिक गटाचा शिरकाव झाला. परंतु अलीकडेच शिवाजीराव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने अजित पवार गटाला नाईक यांच्या रूपाने ऊर्जा मिळाली आहे. त्यामुळे दोन्ही मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलत आहेत.

राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता आपण वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. उद्योगसमूह आणि सहकार क्षेत्राला ताकद देऊन शिराळा मतदारसंघात संपर्क वाढवण्यासाठी सातत्याने आपले प्रयत्न सुरू आहेत. - मानसिंगराव नाईक, माजी आमदार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूरshirala-acशिराळाJayant Patilजयंत पाटीलSatyajit Deshmukhसत्यजित देशमुखShivajirao Naikशिवाजीराव नाईक