शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
4
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
5
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
6
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
7
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
8
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
9
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
10
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
11
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
12
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
13
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
14
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
15
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
16
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
17
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
18
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
19
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
20
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
Daily Top 2Weekly Top 5

विट्यात बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

By admin | Updated: May 27, 2015 01:00 IST

नापास होण्याच्या भीतीने कृत्य : आजच निकाल होणार जाहीर!

विटा : मार्चमध्ये बारावीची परीक्षा दिलेल्या रचना सतीश दंडवते (वय १८, रा. यशवंतनगर, विटा, मूळ गाव हिंगणगाव खुर्द, ता. कडेगाव) या विद्यार्थिनीने घरी ओढणीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. बारावीचा एक पेपर अवघड गेल्याने नापास होण्याच्या भीतीने रचनाने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. विटा पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक सतीश दंडवते यांची ती कन्या आहे. या घटनेने विटा शहरासह कडेगाव व खानापूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.हिंगणगाव खुर्द येथील सतीश दंडवते कुटुंबियांसमवेत विटा येथे राहतात. त्यांची कन्या रचना मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या विज्ञान शाखेत शिकत होती. तिने मार्चमध्ये परीक्षा दिली होती. परीक्षेत तिला एका विषयाचा पेपर अवघड गेला होता. बुधवार, दि. २७ रोजी बारावीचा आॅनलाईन निकाल जाहीर होणार आहे. मात्र अनुत्तीर्ण होण्याच्या भीतीखाली ती कायम वावरत होती. मंगळवारी सकाळी आई, वडील, भाऊ व रचना कऱ्हाड येथे नातेवाईकांकडे जाणार होते. त्यांची तयारी सुरू होती. रचना बेडरूममध्ये कपडे बदलण्यासाठी गेली. तिने खोलीचा दरवाजा आतून बंद केला होता. बराच वेळ झाला तरी ती बाहेर आली नाही. त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी तिला बाहेर बोलाविण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेर खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, तिने ओढणीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. तिला तातडीने विट्यातील खासगी रुग्णालयात नेले, परंतु तिथे दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. घटनास्थळी रचनाने लिहिलेली चिठ्ठी मिळाली असून या चिठ्ठीत ‘मला बारावीचा एका विषयाचा पेपर अवघड गेल्याने, मी नापास होणार आहे. त्यामुळे मी आत्महत्या करीत असून याप्रकरणी कोणालाही जबाबदार धरू नये’ असा मजकूर आहे. या घटनेने विटा शहरात खळबळ उडाली होती. बारावीचा निकाल बुधवारी जाहीर होणार असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची नोंद विटा पोलिसांत झाली असून पोलीस उपनिरीक्षक आर. बी. वाघमोडे तपास करीत आहेत. (वार्ताहर)‘आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये’घटनास्थळी रचनाने लिहिलेली चिठ्ठी मिळाली असून त्या चिठ्ठीत ‘मला बारावीचा एका विषयाचा पेपर अवघड गेल्याने, मी नापास होणार आहे. त्यामुळे मी आत्महत्या करीत असून याप्रकरणी कोणालाही जबाबदार धरू नये’, असा मजकूर लिहिला आहे.