शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाचशे रोपं देऊन जागवल्या आजीच्या आठवणी

By admin | Updated: August 2, 2016 00:58 IST

झाडे बनून आजी देईल सावली : खानापूरमधील अमोल जाधव यांचा समाजिक उपक्रम

सातारा : जीवापाड प्रेम केलेल्या, जिच्या अंगा-खांद्यावर वाढलो, त्या आजीच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती कायम जतन करण्यासाठी खानापूर येथील अमोल शंकरराव जाधव यांनी तब्बल पाचशे रोपे अन् साडेतीनशे परीक्षा पॅडचे वाटप केले आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.आपल्या जीवाभावाच्या, रक्ताच्या नात्यातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर मोठे दु:ख होते. त्यांच्या स्मृती जनत करण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही उपक्रम राबवित असतो. काहीजण गावातील शाळा, मंदिर, सार्वजनिक ठिकाणी गरजेच्या वस्तू भेट देतात. त्यांचा समाजाला कसे अन् किती कालावधीसाठी उपयोग होईल, हा गौण भाग असतो; मात्र त्यामागची भूमिका महत्त्वाची असते. खानापूर येथील अमोल शंकरराव जाधव यांच्या आजी ताईसाहेब जाधव यांचे गेल्यावर्षी वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. आजीच्या निधनानंतर वर्षभर त्यांच्या आठवणी येत होत्या. त्यांच्या निधनाला नुकतेच वर्षपूर्ती झाले. आजीच्या स्मृती कायम स्मरणात राहाव्यात, यासाठी अमोल जाधव यांनी अनोखा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. समाज कार्याची जोड देत असताना रोपे वाटप करण्याचा निर्णय घेतला. हीच रोपे भविष्यात मोठी झाल्यास ते आजीसारखी मायेने लोकांना सावली देतील, ही त्यांची भूमिका होती. त्यासाठी जाधव हे अनेक दिवसांपासून कामाला लागले. शिरवळ येथील खासगी रोपवाटिकेतून पाचशे रोपे खरेदी केली. यामध्ये आवळा, सीताफळ, शेवगा यासह अनेक जातीच्या रोपांचा समावेश होता. यावेळी धार्मिक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला आलेल्या सुमारे पाचशे पाहुण्यांना रोपे प्रदान केले. या रोपांची लागवड करून त्यांची जोपासना करण्याचा संकल्प यावेळी आलेल्या पाहुण्यांनी जाधव यांच्याजवळ बोलून दाखविला. अमोल जाधव यांच्या या उपक्रमाचे वाई तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. (प्रतिनिधी)