शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

गॅस्ट्रोसदृश आजाराने वृध्दाचा मृत्यू

By admin | Updated: November 21, 2014 00:26 IST

मिरजेतील घटना : साथीच्या आजाराने अनेकजण रुग्णालयात

मिरज : मिरज शहरात गॅस्ट्रोसदृश आजाराने अस्लम नदाफ (वय ६५) या वृध्दाचा मृत्यू झाला; मात्र महापालिका आरोग्य विभागाने शेख यांचा मृत्यू अन्य आजाराने झाल्याचा दावा केला. दूषित पाणी पुरवठ्यामुळे उलट्या व जुलाबामुळे अनेकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वेताळनगर येथील अस्लम नदाफ यांना उलट्या, जुलाबाचा त्रास सुरू होता. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. नदाफ यांच्या मृत्यूनंतर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेताळनगर परिसरात रुग्णांचे सर्वेक्षण केले. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी कुलकर्णी यांनी शेख यांचा जुलाब व अन्य आजारांमुळे मृत्यू झाल्याचे सांगितले. गेले काही दिवस दूषित पाण्याचा पुरवठा सुरू असल्याने उलट्या व जुलाबाने या परिसरातील अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नदीवेस, वखारभाग, परिसरातही दूषित पाणी व अस्वच्छतेमुळे साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त आहेत. शहरात अनेक ठिकाणी दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोसदृश आजाराची लागण झाल्याने रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महापालिकेच्या जलवाहिनीत सांडपाणी मिसळून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने उलट्या व जुलाबाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. भारतनगर, हडको कॉलनी, उद्गाव वेस, नदीवेस, वैरण बाजार, गुरुवार पेठ परिसरात नळाद्वारे दूषित पाणी येत आहे. शहरात अनेक ठिकाणी ड्रेनेजसाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. खोदकाम करताना जलवाहिन्यांना मोठ्याप्रमाणात गळती लागली आहे. मात्र जलवाहिन्यांची दुरूस्ती न करता ड्रेनेज वाहिन्यांचे काम आटोपण्यात आल्याने मोठ्याप्रमाणात सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत आहे. रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले असून, त्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण आहेत.आठ ते दहाजणांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रुग्णांमध्ये बालके, महिला व वृध्दांचा समावेश आहे. दूषित पाण्यामुळे उलट्या व जुलाबाच्या तक्रारी असलेल्या रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना, महापालिका प्रशासनाने व आरोग्य विभागाने याबाबत दखल घेतली नसल्याने नागरिक संतप्त आहेत. (वार्ताहर)आरोग्य धोक्यातदूषित पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. उलट्या व जुलाबाची लक्षणे असलेल्या सुमारे २५ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.