शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

भास्कर जाधव यांच्या कार्यालयाची झडती

By admin | Updated: May 27, 2015 01:01 IST

तुरंबव प्रकरण : पोलीस कारवाईमुळे आमदार संतप्त

चिपळूण : तुरंबव येथे दोन गटात झालेल्या मारहाणीचे पडसाद सर्वत्र उमटत असून, पोलीस दोन्ही गटातील आरोपींचा शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळुणातील कार्यालयाची तपासणी केली. या घटनेमुळे आमदार जाधव संतप्त झाले आहेत. चार दिवसांपूर्वी तुरंबव-पालेवाडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमात दोन गटात मारहाणीचा प्रकार घडला. दोन्ही गटातील परस्पर विरोधी तक्रारी सावर्डे पोलीस ठाण्यात देण्यात आल्या असून, तपासाच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा काम करीत आहे.काही संशयित आरोपी अद्याप फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक मकेश्वर, उपनिरीक्षक अनंत कोकरे व अन्य सहकाऱ्यांनी आमदार जाधव यांच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली. यामध्ये कोणतीही गोष्ट संशयास्पद वाटली नाही. संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी ही तपासणी करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात वेग यावा आणि यातील सर्व आरोपींना अटक व्हावी, अशी मागणी काँग्रेसकडून सातत्याने केली जात आहे. माजी खासदार नीलेश राणे यांनी केलेल्या मागणीपाठोपाठ काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांनीही याबाबतचे निवेदन पोलिसांना दिले आहे. त्यामुळे या कारवाईला आता राजकीय वळण लागले आहे. त्यामुळे पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू ठेवला आहे. (वार्ताहर)