शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘कवठेमहांकाळ’मध्ये शेतकरी संघटनेचा शिरकाव

By admin | Updated: December 29, 2014 23:44 IST

ऊस दरासाठी आक्रमक पवित्रा : मोर्चेबांधणीस प्रारंभ; बोरगाव येथे पहिली शाखा सुरू

अर्जुन कर्पे - कवठेमहांकाळ तालुक्यात रघुनाथदादा पाटील यांची शेतकरी संघटना आक्रमक झाली असून या दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न तडीस लावण्यासाठी संपूर्ण तालुकाभर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे जाळे विणण्याचे काम जोमात सुरू करण्यात आले आहे. या संघटना बांधणीचा विडा शेतकरी संघटनेचे नेते अशोकराव माने यांनी उचलला असून रघुनाथदादा पाटील यांनी प्रत्यक्ष कामाला या तालुक्यात सुरुवात केल्याने शेतकऱ्यांना व त्यांच्या चळवळीला न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.वर्षानुवर्षे दुष्काळाच्या खाईत लोटलेला कवठेमहांकाळ तालुका या दोन वर्षात त्यातून बाहेर पडत आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी तालुक्याच्या शिवारात सलग दोन वर्षे फिरविल्याने ५५ टक्के भूभाग ओलिताखाली आला आहे. या पाण्यावर ऊस, द्राक्षबागा, डाळिंब बागा, मका, गहू, इतर पिके यांचे उत्पादन वाढले आहे. मात्र शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव तर मिळतच नाही. दलालांचे मोठे जाळे खरेदी-विक्री प्रक्रियेत असल्याने शेतकऱ्यांना फायदा कमी प्रमाणात मिळतो. कधी-कधी मोठा तोटाही सहन करावा लागतो. उसाचे क्षेत्र मिळूनही एफआरपीनुसार शेतकऱ्यांना दर मिळत नाही. एरव्ही शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या वल्गना करणाऱ्या विविध संघटना ऐन लढाईच्यावेळी गायब होतात. निवडणुका संपल्या की हे नेतेही गायब होतात, असे विदारक चित्र आहे.मात्र शेतकरी संघटनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनात्मक बांधणी करण्यास पाटील यांनी सुरुवात केली आहे. बोरगाव येथे रघुनाथदादांच्या शेतकरी संघटनेच्या तालुक्यातील पहिल्या शाखेचे उद्घाटन नुकतेच झाले. या मेळाव्यात तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर आपण तीव्र लढा उभारणार असल्याचे सांगितले आहे.करोली (टी), हिंगणगाव, रांजणी, अग्रण धुळगाव, ढालगाव, कुची, खरशिंग, नागज, अलकूड (एस), कोकळे येथे या महिन्यात संघटनात्मक बांधणी करण्याचे काम सुरू झाले आहे. अशोकराव माने यांनी संघटना बांधणीसाठी गावा-गावात बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. .किमान रघुनाथदादा पाटील यांची तरी शेतकरी संघटना येथील शेतकऱ्यांचे प्रश्न तरी सोडवते का ते पहावयाचे आहे की ये रे माझ्या मागल्या अशीच अवस्था त्यांचीही होते, हे लवकरच कळेल.संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी आपण राज्यभर मोठी मोहीम हाती घेतली असून, कवठेमहांकाळ-सारख्या दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न आपण संघटनेच्या माध्यमातून तडीस नेऊ, त्यादृष्टीने तालुक्यात संघटनात्मक पातळीवर बांधणी सुरू आहे. - रघुनाथदादा पाटील, नेते, शेतकरी संघटनासंपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी आपण राज्यभर मोठी मोहीम हाती घेतली असून, कवठेमहांकाळ-सारख्या दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न आपण संघटनेच्या माध्यमातून तडीस नेऊ, त्यादृष्टीने तालुक्यात संघटनात्मक पातळीवर बांधणी सुरू आहे. - रघुनाथदादा पाटील, नेते, शेतकरी संघटना