शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
5
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
6
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
7
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
8
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
9
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
10
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
11
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
12
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
13
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
15
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
16
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
17
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
18
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
19
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
20
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
Daily Top 2Weekly Top 5

कुपवाडला उद्योजकाची नऊ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:29 IST

कुपवाड : कुपवाड एमआयडीसीमधील उमेद टेक्सटाईल या कारखान्यामधील ओळखीचा फायदा घेऊन इचलकरंजीतील व्यापारी बापलेकांनी काॅटन यार्नच्या ११७ बॅगा नेऊन ...

कुपवाड : कुपवाड एमआयडीसीमधील उमेद टेक्सटाईल या कारखान्यामधील ओळखीचा फायदा घेऊन इचलकरंजीतील व्यापारी बापलेकांनी काॅटन यार्नच्या ११७ बॅगा नेऊन ९ लाख ४२ हजारांची फसवणूक केली. याबाबतची तक्रार उद्योजक सतीश मालू यांनी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

रामस्वरूप मदनलाल बोहरा, अंकित रामस्वरूप बोहरा (दोघेही रा.ब्लाॅक नंबर ७१, स्वप्नमंती, राजर्षी शाहू मार्केट, इचलकरंजी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, इचलकरंजीमधील कापड व्यापारी रामस्वरूप बोहरा व अंकित बोहरा मार्च, २०२१ ते १३ जुलै, २०२१ या कालावधीत कुपवाड एमआयडीसीतील उमेद टेक्सटाईल या कंपनीत येत होते. त्यांनी कंपनीचे मालक सतीश मालू यांची भेट घेतली. जुनी ओळख सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. बोहरा बापलेकांनी व्यवसाय अडचणीत असल्याने मदत मागितली. आपल्याकडे काॅटन यार्नचे ग्राहक आहेत, माल विकून पैसे देतो, असे सांगून ११७ बॅगा इचलकरंजीमधील स्वामी समर्थ ट्रान्सपोर्टच्या वाहनातून त्यांच्या महालक्ष्मी टेक्सकाॅम (इचलकरंजी) या कंपनीच्या नावाने नेला.

त्यानुसार, संशयित अंकित बोहरा यांनी तीन वेगवेगळ्या रकमेचे धनादेश दिले होते. ते बँकेतून परत आले होते. मालू यांनी बोहरा यांना रकमेची वेळोवेळी मागणी केली असता, त्यांनी रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे मालू यांना फसवणूक झाल्याचे समजताच, बोहरा यांच्या विरोधात कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, कुपवाड पोलिसांनी दोन जणांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.