शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कुंभमेळ्याला चाललेली हत्तीण वनविभागाने मिरजेत अडविली

By admin | Updated: December 4, 2014 23:37 IST

तक्रारीनंतर कारवाई : प्रवासाचा परवाना नाही

मिरज : नाशिक येथे कुंभमेळ्यासाठी नेण्यात येणारी हत्तीण मिरजेत वनविभागाने ताब्यात घेतली. पायी चालवत नेण्यात येत असल्याने व प्रवासाचा परवाना नसल्याने हत्तीणीला ताब्यात घेऊन वनविभागाच्या कुपवाड येथील कार्यालयात ठेवण्यात आले आहे.
अळणापूर संस्थान, करमाळा येथील हत्तीण नाशिक येथे महाकुंभमेळ्यासाठी नेण्यात येत होती. मोहन शेगर, मोहन चौगुले, आदिनाथ शिंदे, सुभाष शेगर, जयप्रकाश शेगर, बाबाजी शेगर, माहूत प्रकाश नाईक, पेरूलाल नाईक (रा. करमाळा) हे हत्तीणीला पायी चालवत मिरजेतून सांगलीला नेत होते.
पीपल्स फॉर अ‍ॅनिमलचे अशोक लकडे यांनी याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर वन अधिकारी एस. के. वाघमारे यांनी कृपामयी हॉस्पिटलजवळ हत्तीणीला ताब्यात घेतले. हत्तीणीचा प्रवास परवाना, वैद्यकीय प्रमाणपत्र माहुताकडे नव्हते. लांबच्या प्रवासाला नेताना हत्तीला ट्रकमधून नेणे आवश्यक असल्याच्या कारणावरून सुमारे दोन वर्षे वयाच्या पाळीव हत्तीणीला ताब्यात घेऊन कुपवाड येथील वनविभागाच्या कार्यालयात नेण्यात आले. (वार्ताहर)



कागदपत्रे दिल्याशिवाय ताबा देणार नाही
दोन महिन्यांपूर्वी करमाळा येथून प्रवासाला निघालेली हत्तीण कर्नाटकातील मंजुस्थान धर्मस्थळ येथून कोल्हापुरात आली. तेथून मिरज, सांगली या मार्गाने शिर्डीला नेऊन नाशिक येथे महाकुंभ मेळ्यासाठी नेत असल्याचे माहुतांनी सांगितले. हत्तीच्या प्रवासासाठी आवश्यक कागदपत्रे नसल्याने हत्ती वनविभागाने ताब्यात घेतला आहे. संबंधित माहुतास कागदपत्रांची पूर्तता करण्याची सूचना अधिकाऱ्यांनी दिली आहे. कागदपत्रे मिळेपर्यंत ही हत्तीण वनविभागाचा पाहुणचार घेणार आहे.