शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

‘राजारामबापू’मुळेच नदी प्रदूषित

By admin | Updated: May 26, 2015 00:57 IST

रघुनाथदादांचा आरोप : प्रदूषण नियंत्रणची गांधारीची भूमिका

सांगली : राजारामबापू साखर कारखान्याचे मळीमिश्रित दूषित पाणी कृष्णा नदीत मिसळत असल्यामुळेच नदीतील मासे मृत झाले आहेत. कारखान्यांचे दूषित पाणी सांगलीतील लाखो जनतेला प्यावे लागत आहे. तरीही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी गांधारीची भूमिका घेऊन जनतेच्या जिवाशी खेळत आहेत, असा आरोप शेतकरी संघटना अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सोमवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केला. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवानगी न घेताच को-जनरेशन आणि कारखान्याच्या विस्तारिकरणाचे काम सुरु केल्याबद्दल, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय अधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पाणी, वीज आणि बँक खाती सील का करू नयेत, अशी नोटीस दि. ४ फेब्रुवारी २०१५ रोजी पाठवूनही, प्रदूषण नियंत्रणच्या सांगलीतील अधिकाऱ्यांनी त्यावर कोणतीच कारवाई केली नसल्याची टीकाही त्यांनी केली.ते पुढे म्हणाले की, साखर कारखान्यांचे मळीमिश्रित पाणी थेट कृष्णा नदीत सोडले जात आहे. तरीही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी त्या कारखान्यांवर कोणतीही कारवाई करीत नाहीत. त्यामुळे सांगली आणि कृष्णा नदीकाठच्या गावांतील लाखो जनतेला दूषित पाणी प्यावे लागत आहे. प्रदूषण नियंत्रण कोणत्या कारखान्यामुळे होत आहे, हेही प्रदूषण नियंत्रण अधिकारी जनतेला सांगू शकत नाहीत. एवढा राजकीय दबाव अधिकाऱ्यांवर असेल, तर ते जनतेची सेवा कशी करणार? सांगलीचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी कऱ्हाड तालुक्यातील साखर कारखान्यांची नावे घेऊन आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत. म्हणून आम्ही कोल्हापूर विभागाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी तेथील अधिकाऱ्यांकडून धक्कादायक माहिती मिळाली. राजारामबापू साखर कारखान्याकडून दूषित पाणी होत असतानाही तेथील प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, याबद्दल त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचा परवाना न घेताच कारखान्यामध्ये को-जनरेशन आणि क्षमता वाढविण्यासाठी विस्तारिकरणाचे काम सुरु असल्याचे चौकशी अधिकाऱ्यांनी दिलेल्या भेटीप्रसंगी आढळून आले आहे. याबद्दल विभागीय प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांनी राजारामबापू कारखान्यास दि. ४ फेब्रुवारी २०१५ रोजी नोटीस बजावून, प्रदूषण नियंत्रण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी कारखाना बंद का करू नये, तसेच वीज, पाणी पुरवठा बंद का करू नये आणि तुमची बँक खाती सील का करू नयेत, असे ताशेरे ओढले आहेत, असेही रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिसीतील मुद्देराजारामबापू कारखान्याने को-जनरेशन आणि कारखाना विस्तारिकरणासाठी परवाना न घेताच काम सुरू केल्याबद्दल कारखाना बंद का करू नये.तुमच्या कारखान्याची वीज, पाणी बंद करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना का देऊ नयेप्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनांचे पालन करीत नसल्यामुळे बँक खाती सील का करू नयेत.