शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरातून पानसरेंसाठी अडीचशेवर वकिलांची फौज

By admin | Updated: September 28, 2015 23:45 IST

धनाजी गुरव : सत्तरजणांच्या स्वाक्षऱ्या झाल्याची माहिती

इस्लामपूर : कोल्हापूर येथील ज्येष्ठ कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पानसरे कुटुंबियांतर्फे न्यायालयात बाजू मांडण्यासाठी इस्लामपुरातील २७0 वकिलांची फौज तयार झाल्याची माहिती विद्रोही चळवळीचे कार्याध्यक्ष कॉ. धनाजी गुरव यांनी पत्रकार बैठकीत दिली. आतापर्यंत ७0 वकिलांनी वकीलपत्रावर स्वाक्षरी केली असून मंगळवारी उर्वरित २00 वकील स्वाक्षरी करणार आहेत.गुरव म्हणाले की, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या सनातन संस्थेच्या समीर गाकवाड या संशयित आरोपीसाठी ३0 वकिलांनी बाहेरुन येऊन आव्हान दिले आहे. त्यामुळे विद्रोही चळवळीने कॉ. पानसरे यांच्या कुटुंबियांच्यावतीने बहुजन समाजातील जास्तीत जास्त वकिलांनी या खटल्यात योगदान द्यावे, असे आवाहन केले होते. त्याला येथील इस्लामपूर वकील संघटनेने प्रतिसाद दिला. अध्यक्ष अ‍ॅड. अर्जुन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू आहे. अ‍ॅड. एस. यु. संदे म्हणाले की, कॉ. पानसरे यांच्या हत्येचा तपास प्राथमिक टप्प्यात आहे. त्यातच संशयित समीर गायकवाड यास निर्दोष ठरविण्याचे प्रयत्न त्याच्या वकिलांकडून केले गेले. कॉ. पानसरे यांनी आपले आयुष्य चळवळीला दिले आहे. त्यामुळे त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होण्यासाठी आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या बाजूने लढू.‘अंनिस’चे एल. डी. पाटील म्हणाले की, कॉ. पानसरेंच्या हत्येत केवळ समीर—रुद्रपर्यंतची यंत्रणा नाही. यामध्ये मोठी साखळी आणि षड्यंत्र आहे. यावेळी दीपक कोठावळे, दिग्विजय पाटील, अ‍ॅड. ए. एल. मोहिते उपस्थित होते. (वार्ताहर)त्यांची जागा दाखवू!गुरव म्हणाले की, न्यायाची गरज म्हणून संशयित गायकवाडसाठी युक्तिवाद करणे मान्य, पण न्यायालयाबाहेर येऊन प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांच्या वकिलांनी विचारांची मर्यादा सोडून बेताल आणि समाजात भीती पसरविणारी विधाने केली. त्यांच्या वक्तव्यातून न्याय व्यवस्थेलाच बटिक बनविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून आले. यापुढील काळात सनातनी वृत्ती हस्तक्षेप करतील, तर राज्यातील बहुजन समाज त्यांना त्यांची जागा दाखवेल.