शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन उत्पादकांवर दाटले चिंतेचे ढग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : केंद्र शासनाने बारा लाख मेट्रिक टन सोयाबीन पशुखाद्य आयातीस परवानगी दिल्यानंतर देशातील सोयाबीन दरात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : केंद्र शासनाने बारा लाख मेट्रिक टन सोयाबीन पशुखाद्य आयातीस परवानगी दिल्यानंतर देशातील सोयाबीन दरात घसरण सुरू झाली आहे. १० ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटल असलेला दर आता आठ हजारांवर घसरला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील सोयाबीन उत्पादकांची चिंता वाढली आहे.

सोयाबीनच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतर ऑल इंडिया पोल्ट्री ब्रिडर्स असोसिएशनने केंद्र सरकारकडे शून्य आयात शुल्कावर सोया पशुखाद्य आयातीस परवानगीची मागणी केली होती. त्यास परवानगी देताना वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने अधिसूचनेद्वारे बारा लाख मेट्रिक टन पशुखाद्य आयातीस परवानगी दिली. आयातीच्या या निर्णयानंतर लगेच बाजारात सोयाबीन दरामध्ये घसरण सुरू झाली आहे. बारा हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचलेला दर ८ हजारापर्यंत खाली आला आहे. नवा माल बाजारात येण्यापूर्वी उत्पादकांच्या डोईवर चिंतेचे ढग दाटले आहेत.

देशात दरवर्षी १० ते ११ मिलियन टन सोयाबीन उत्पादन होते. सोया पशुखाद्याची मोठी उलाढालही देशात होते. देशात २०२०-२१ मध्ये ७७ लाख ६० हजार टन सोया पशुखाद्यनिर्मिती झाली. सोयाबीन उत्पादनात मध्य प्रदेश अव्वल असून, त्याखालोखाल महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. देशातील एकूण सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा ३५ टक्क्यांवर आहे. त्यामुळे सोयाबीनच्या धोरणांचा महाराष्ट्रावर मोठा परिणाम होत असतो. आता दरातील घसरणीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे. अनेक वर्षांनंतर बाजारात सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी सुखावला होता, मात्र त्यांचा हा आनंद केंद्र शासनाच्या धोरणाने लगेच मावळला आहे.

चौकट

हमीभावापेक्षा सध्या दर जास्त

केंद्र शासनाने २०२१-२२ करिता सोयाबीनचा हमीभाव मागील वर्षाच्या तुलनेत ७० रुपयांनी वाढवून तीन हजार ९५० रुपये इतका जाहीर केला आहे. सध्या हमीभावापेक्षा दुप्पट दर आहे. तरीही सध्याची घसरण पाहता भाव आणखी किती खाली येणार, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

कोट

शेतकऱ्याला जादा भाव मिळत असताना अचानक आयातीचे धोरण केंद्र शासनाने स्वीकारल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. विदर्भ, मराठवाड्यातील हे मुख्य पीक आहे. कित्येक वर्षांनंतर दराच्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांची चिंता दूर होत असताना शासनाच्या चुकीच्या धोरणाने पुन्हा त्यांना संकटाच्या खाईत ढकलले जात आहे. आम्ही यासाठी लवकरच सोयाबीन परिषद घेऊन शासनाशी संघर्ष करू.

- राजू शेट्टी, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना