शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

नागरिक घरात, लॉकडाऊन जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ओस पडलेले रस्ते, निर्मनुष्य चौक, कुलूपबंद भाजी मंडई, शटर डाऊन बाजारपेठा अशा वातावरणात वीकेंड ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : ओस पडलेले रस्ते, निर्मनुष्य चौक, कुलूपबंद भाजी मंडई, शटर डाऊन बाजारपेठा अशा वातावरणात वीकेंड लाॅकडाऊनला सांगली शहरात मोठा प्रतिसाद मिळाला. नागरिकच नव्हे तर वाहनेसुद्धा बाहेर पडली नाहीत. त्यामुळे पोलिसांवर लॉकडाऊन काळात कोणताही ताण पडला नाही.

सांगली शहरात शुक्रवारी रात्री आठपासून सुरू झालेली शांतता शनिवारी लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशीही कायम राहिली. सांगलीतील स्टेशन चौक, राजवाडा चौक, हरभट रोड, मारुती रोड, गणपती पेठ, कापड पेठ, स्टँड परिसर, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, विश्रामबाग, शंभर फुटी रस्ता, कोल्हापूर रोड अशा सर्व ठिकाणी नेहमी नागरिकांची गर्दी असते. शनिवारी या परिसरात शुकशुकाट होता. रस्ते, चौक, भाजी मंडई सर्व ओस पडले होते.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून शहरातील चौकाचौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नागरिकच बाहेर न पडल्यामुळे पोलिसांनी बसून राहणे पसंत केले. दुपारी काही वेळ पोलिसांनाही विश्रांती मिळाली. त्यामुळे शहर ओस पडले होते. वाहनेही रस्त्यावर फारशी दिसली नाहीत. रिक्षा, बस वाहतूक, खासगी प्रवासी वाहतून सर्व बंद होते. नागरिकही घरात राहिल्यामुळे अपवादाने रस्त्यावर वाहने दिसत होती.

चौकट

भाजी मंडईला कुलूप

सांगलीच्या जुन्या भाजी मंडईला कुलूप लावण्यात आले होते. याच परिसरातील फळविक्रेत्यांची दुकानेही बंद होती. फळांच्या विक्रीस लॉकडाऊनमध्ये परवानगी होती. मात्र, तरीही सर्वांनी बंदमध्ये सहभाग घेतला. शिवाजी मंडईतील दुकानेही कुलूपबंद झाली आहेत.

चौकट

दूध वितरणावर २० टक्के परिणाम

शहरातील दूध वितरणावर लाॅकडाऊनमुळे विपरीत परिणाम झाला. उपनगरांमध्ये होणाऱ्या दूध वितरणात २० टक्के घट झाली. दूध वितरकांनी सांगितले की, डेअऱ्यांकडून शहरात माल आला; पण शहरांतर्गत वितरणावर थोडासा परिणाम झाला. रविवारी तो सुरळीत होण्याची शक्यता आहे.

चौकट

ना दंड, ना वाद

दररोज विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर महापालिका व वाहतूक पोलिसांमार्फत दंड केला जातो. यावेळी अनेकदा वादावादीही होत असते. शनिवारी लॉकडाऊन काळात नागरिकच फारसे घराबाहेर न पडल्यामुळे ना कोणावर दंड करण्याची वेळ आली ना वादावादी झाली.

चौकट

पोलिसांवरील ताण कमी

नागरिकांनी घरातच बसणे पसंत केल्यामुळे रस्ते निर्मनुष्य झाले. त्यामुळे रस्त्यावर बंदोस्तासाठी आलेल्या पोलिसांना फार काही करावे लागले नाही. त्यांच्यावरील ताण कमी झाला. तरीही दिवसभर ओस पडलेले चौक व रस्ते पाहत त्यांना बंदोबस्त पार पाडावा लागला.