शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
5
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
6
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
7
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
8
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
9
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
10
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
11
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
12
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
13
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
14
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
15
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
16
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
17
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
18
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
19
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
20
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
Daily Top 2Weekly Top 5

बीओटी, कर्जास स्वाभिमानीचा विरोध

By admin | Updated: May 27, 2015 01:02 IST

गौतम पवार : कायद्याचे उल्लंघन केल्यास लढा उभारू

सांगली : महापालिकेने आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी काही जागा बीओटीवर विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शासनाच्या योजनांसाठी २०० कोटीचे कर्ज घेतले जाणार आहे. या दोन्ही विषयांना स्वाभिमानी आघाडीचा विरोध असल्याचे नगरसेवक गौतम पवार यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत सांगितले. बीओटीत कायद्यानुसार प्रक्रिया राबविल्यास पाठिंब्याचा विचार होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. पवार म्हणाले की, बीओटीचा पूर्वानुभव फारच वाईट आहे. त्यामुळे नव्याने बीओटीचे प्रकल्प राबविण्यास आमचा विरोध आहे. त्याबाबत आयुक्तांना निवेदन दिले आहे. महापालिकेने शहरातील मालमत्तांची सूची तयार करावी, त्यांचे वर्गीकरण करावे, बाजारमूल्य, भाडेमूल्य ठरवून फेरमूल्यांकन व्हावे, अशी मागणी केली आहे. व्यावसायिक भूखंडाची निश्चिती करून त्याची यादी जाहीर झाली पाहिजे. काही जागा क्रीडांगण, नाट्यगृहे यांना राखीव असल्या पाहिजेत. बीओटी करताना प्रशासन, सत्ताधाऱ्यांनी कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यांचा डाव हाणून पाडू. आतापर्यंत कायद्याचा गैरअर्थ लावून बीओटीत भूखंडांची लूट झाली आहे. पाणी, ड्रेनेजसह विविध योजनांसाठी २०० कोटीचे कर्ज उभारण्याबाबत आयुक्तांनी नुकतीच पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. पण कर्ज उभारताना कारण, तारण व परतफेडीची माहिती सदस्यांना दिली पाहिजे. त्याशिवाय प्रशासनाने कोणतेही पाऊल उचलू नये. आयुक्तांनी मागील महासभेच्या ठरावाचा आधार घेत कर्ज उभारणीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याला आमचा विरोध आहे. बीओटी व कर्ज या दोन्ही विषयावर जनतेतून लढा उभारण्याचा इशाराही पवार यांनी दिला. (प्रतिनिधी)...तरच पाठिंबा देऊमहापालिकेने भूखंडाचे मूल्यांकन करून त्यावर महासभेत पारदर्शी चर्चा घडविली पाहिजे. आतापर्यंत गुपचूप भूखंड लुटीचा उद्योग झाला आहे. त्यामुळे आता महापालिकेने आपला हक्क अबाधित राखून नियमानुसार चर्चा घडवून बीओटी होणार असेल, तर आमचा पाठिंबा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.