शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी, उपमहापौरपदी मगदूम यांची बिनविरोध निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 15:29 IST

अजितदादांच्या आठवणीने उपमहापौर भावुक: भाजपचा जल्लोष

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे धीरज चंद्रकांत सूर्यवंशी, तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे गजानन रामू मगदूम यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. पीठासन अधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी निवडीची अधिकृत घोषणा केली. यानंतर दोन्ही पक्षाच्या समर्थकांनी घोषणाबाजी करीत जल्लोष केला.

महापालिका निवडणुकीत भाजपला ३९ जागा मिळाल्या होत्या. सभागृहात स्पष्ट बहुमतांसाठी एका जागेची गरज होती. काँग्रेसला १८, राष्ट्रवादी (अजित पवार) १६, शिंदेसेना २, तर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला तीन जागा मिळाल्या होत्या.  भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष एकत्र आल्याने संख्याबळ ५५ झाले होते. महापौर पदासाठी भाजपकडून धीरज सूर्यवंशी, तर उपमहापौर पदासाठी गजानन मगदूम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यात विरोधी काँग्रेसने महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे निवडी बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले होते. 

मंगळवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. या सभेत दोन्ही पदांसाठी एकच अर्ज दाखल झाल्याने सूर्यवंशी व मगदूम यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केले. निवडीनंतर नूतन महापौर, उपमहापौरांचा नरवाडे, आयुक्त सत्यम गांधी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

माजी खासदार संजय पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश आवटी, दिलीप सूर्यवंशी, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांनीही नूतन महापौर, उपमहापौर यांचे अभिनंदन केले.

अजितदादांच्या आठवणीने उपमहापौर भावुक

नूतन उपमहापौर गजानन मगदूम हे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणीने भावुक झाले. मगदूम यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. अर्ज भरण्याच्या शेवटच्या तासात अजितदादांशी त्यांचे बोलणे झाले. राष्ट्रवादीचा एबी फाॅर्मही मिळाला. मगदूम निवडून आले आणि उपमहापौरही झाले. या साऱ्या प्रवासात ते सतत अजितदादांच्या संपर्कात होते. खो-खो संघटनेत ते अजितदादांसोबत सहसचिव म्हणूनही काम केले होते. या साऱ्या आठवणींनी काहीवेळ त्यांच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP's Dhiraj Suryavanshi Elected Sangli Mayor, Magdum Deputy Mayor

Web Summary : Dhiraj Suryavanshi (BJP) became Sangli Mayor, G. Magdum (NCP-Ajit Pawar) deputy unopposed. BJP-NCP coalition secured majority. Magdum recalled his association with Ajit Pawar.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६SangliसांगलीMayorमहापौरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार