शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’त फूट पाडण्याची भाजपची खेळी

By admin | Updated: May 26, 2015 00:55 IST

निवडीला काहींचा विरोध : सदाभाऊंऐवजी राजू शेट्टी यांना मंत्रीपद देण्याच्या हालचाली

अशोक पाटील -इस्लामपूर -जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांना राज्य मंत्रिमंडळात घेण्याचे लेखी पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. परंतु त्यांच्या या निवडीला काहींचा विरोध आहे. याला पर्याय म्हणून खासदार राजू शेट्टी यांना केंद्रातील राज्य मंत्रिमंडळात स्थान देण्याच्या खेळ्या भाजपच्या काही नेत्यांच्यातून सुरू आहेत. यामागे फक्त स्वाभिमानी संघटनेत फूट पाडण्याचाच कट रचला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातच राजू शेट्टी हे विजयी होणार, याची खात्री पटली होती. ते शेतकऱ्यांचे नेते म्हणून परिचित असल्याने त्यांना देशाचे कृषीमंत्री पद मिळणार, अशी हवाही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पसरवली होती. यासाठी राजू शेट्टी यांनी दिल्लीत तळही ठोकला होता. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत शेट्टी यांची कोणीही दखल घेतली नाही. लोकसभा निवडणुकीतच स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी म्हाढा मतदारसंघात विजयसिंह मोहिते-पाटील यांना कडवी झुंज दिली. खोत यांचा निसटता पराभव झाला असला, तरी त्यांचे भाजप नेत्यांनी मोठे कौतुक केले. याचेच बक्षीस म्हणून खोत यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान देण्याविषयी खलबते झाली. परंतु यालाही बराच कालावधी गेल्याने खोत यांनी नाराजी व्यक्त करून भाजप सरकारवर तोफ डागली. उसाच्या एफआरपीवरून भाजप सरकार आणि स्वाभिमानी संघटनेतील दरी रुंदावेल का? अशीही हवा होती. परंतु दोन्ही नेत्यांनी मंत्रिपदाच्या लालसेपोटी ऊसदर आंदोलनाची आक्रमकता कमी केली. परंतु ज्या ऊस उत्पादकांच्या जिवावर निवडून आले, ते शेतकरी मात्र संघटनेवर नाराज झाले आहेत.सदाभाऊ खोत हे शिराळा मतदारसंघातील नेते आहेत. याच मतदारसंघातील भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांना मंत्रिपदाचा शब्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रचाराच्या सभेत दिला होता. नुकत्याच कोल्हापूर येथे झालेल्या भाजपच्या राज्य कार्यकारिणी परिषदेत गडकरी यांनी पुन्हा एकदा आ. नाईक यांना मंत्रीपद देण्याचा पुनरुच्चार केला आहे. एका मतदारसंघात दोन मंत्रीपदे देण्यापेक्षा खोत यांच्याऐवजी शेट्टी यांना केंद्रात स्थान दिल्यास त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करता येईल, अशी चर्चा आहे. भाजपला स्वाभिमानी संघटनेत फूट पाडण्याची राजकीय खेळी असण्याची शक्यता आहे.आपणास मंत्रिपदाची संधी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. याचा निर्णय लांबणीवर पडत असल्याने शांतता बाळगली आहे. माझ्याऐवजी राजू शेट्टी यांना मंत्रीपद देण्याच्या हालचालीबाबत आपणास काहीही माहीत नाही. त्यांना संधी मिळाल्यास मला आनंदच होईल.- सदाभाऊ खोत, प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना