Sangli: बहिणीच्या सासूरवाडीशी अजित पवारांनी जपले होते जिव्हाळ्याचे नाते

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 17:44 IST2026-01-29T17:41:34+5:302026-01-29T17:44:43+5:30

Ajit Pawar Passed Away: कॅप्टन आर. जी. पाटील यांचे पुत्र डॉ. मोहन पाटील यांचा विवाह १९७६ दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या थोरल्या भगिनी विजया पवार यांच्याशी झाला. तेव्हापासून बारामती आणि उरूण ईश्वरपूरचा नातेबंध

Ajit Pawar had maintained a close relationship with his sister's in laws village of Ishwarpur sangli | Sangli: बहिणीच्या सासूरवाडीशी अजित पवारांनी जपले होते जिव्हाळ्याचे नाते

Sangli: बहिणीच्या सासूरवाडीशी अजित पवारांनी जपले होते जिव्हाळ्याचे नाते

ईश्वरपूर : उरूण परिसरातील पोलिस पाटील भावकीतील कॅप्टन आर. जी. पाटील यांचे पुत्र डॉ. मोहन पाटील यांचा विवाह १९७६ दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या थोरल्या भगिनी विजया पवार यांच्याशी झाला. तेव्हापासून बारामती आणि उरूण ईश्वरपूरचा नातेबंध आहे. याची आठवण अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे उरूण ईश्वरपूरकरांना झाली आहे.

उरूण परिसरातील दिवंगत कॅप्टन आर. जी. पाटील यांना ४ मुले आहेत. यापैकी डॉक्टर मोहन पाटील यांचा अजित पवार यांच्या भगिनी विजया पाटील यांच्याशी विवाह झाला. सध्या कोल्हापूर शहरात डॉ. मोहन पाटील स्थायिक झाले आहेत. परंतु त्यांच्याच घरातील वाळवा तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष केदार पाटील आणि त्यांचे कुटुंब ताकारी रस्त्यावरील असलेल्या निवासस्थानी राहतात. सन १९७६ पासून अजित पवार हे केदार पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन पाहुणचार घेत होते.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उरूण ईश्वरपूरशी नातेबंध असल्याने राष्ट्रवादी पक्षाच्या बांधणीला अग्रक्रम दिला होता.१९७६ पासून असलेले स्नेहाचे संबंध आजही पवार यांनी जपले होते. आता त्यांच्या निधनाने दिवंगत कॅप्टन आर. जी. पाटील यांच्या कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

Web Title: Ajit Pawar had maintained a close relationship with his sister's in laws village of Ishwarpur sangli