शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: अजितराव घोरपडेंच्या भूमिकेने खासदारांची पंचाईत, तासगाव-कवठेमहांकाळला उलटफेर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 19:00 IST

माजी खासदारांशी हातमिळवणीची शक्यता

दत्ता पाटीलतासगाव : लोकसभा निवडणुकीत माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी भाजपचे उमेदवार संजय पाटील यांच्या थेट विरोधात भूमिका घेत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठबळ दिले होते. मात्र, अवघ्या काही महिन्यांत तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात उलटफेर झाला आहे. घोरपडे विधानसभेसाठी पुन्हा माजी खासदार पाटील यांच्याशी हातमिळवणी करण्याची शक्यता आहे. घोरपडे यांच्या भूमिकेमुळे खासदार विशाल पाटील यांची पंचाईत होणार आहे. घोरपडे आणि संजय पाटील यांचे मनोमिलन झाल्यास, खासदार पाटील यांची गोची होणार आहे.सलग दोन लोकसभा निवडणुकीत तत्कालीन खासदार संजय पाटील यांना पाठबळ दिलेल्या माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी या लोकसभा निवडणुकीत संजय पाटील यांच्या पराभवासाठी कंबर कसली होती. अपक्ष विशाल पाटील यांना रसद दिली होती.

महिनाभरापूर्वी सावर्डे येथे खासदार पाटील यांचा घोरपडे गटाच्यावतीने सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी ‘लोकसभा निवडणुकीसाठी अजितराव घोरपडे यांच्याशिवाय पर्याय नव्हता. तसेच आता विधानसभा निवडणुकीसाठीही घोरपडे यांच्याशिवाय पर्याय नाही. संजय पाटील यांना पुन्हा वर येण्याची संधी द्यायची नाही, अशा शब्दांत इशारा देत खासदार पाटील यांनी घोरपडे यांना सोबत घेऊन रोहित पाटील यांना पाठबळ देण्याची भूमिका घेतली होती.

लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतरही विशाल पाटील विरुद्ध संजय पाटील, असा संघर्ष सातत्याने पाहायला मिळाला. संधी मिळेल तिथे विशाल पाटील यांनी संजय पाटील यांच्या विरोधात राजकीय संघर्षाची भूमिका घेतली होती. लोकसभेच्या पटावर कट्टर शत्रू असलेल्या माजी खासदारांसोबत, घोरपडे सरकारांनी जुळवून घेतल्याने विशाल पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.

राज्य पातळीवर नाट्यमय घडामोडीतासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात आमदार व घोरपडे गटाची लोकसभेसाठी झालेली एकजूट विधानसभेलादेखील कायम राहील, अशी चर्चा होती. मात्र, राज्य पातळीवर झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर, घोरपडे यांनी अनपेक्षितपणे माजी खासदारांसोबत जुळवून घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे खासदार पाटील यांची चांगलीच पंचाईत झाल्याची चित्र आहे.

..तर कडू गोळी घ्यावी लागेलअजितराव घोरपडे यांनी कवठेमहांकाळ येथील मेळाव्यात ‘विधानसभेला आपला आमदार करायचा असेल, तर कडू गोळी घ्यावी लागेल’, असे वक्तव्य केले. दोन दिवसांत याबाबत निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले. मात्र, अद्याप भूमिका स्पष्ट केली नाही. घोरपडे यांनी रोहित पाटील यांना पाठबळ द्यावे, यासाठी खासदार विशाल पाटील यांचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. त्यांच्या प्रयत्नांना कितपत यश मिळेल, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

टॅग्स :Sangliसांगलीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४tasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024congressकाँग्रेसBJPभाजपा