शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

'एआय'च्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुटीचा डाव - रघुनाथ पाटील 

By अशोक डोंबाळे | Updated: June 18, 2025 17:27 IST

फसवेगिरीविरोधात राज्यभर जनजागृती करणार

अशोक डोंबाळे

सांगली : कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) आणून शेतीमध्ये वापरायला सांगून शेतकऱ्यांना लुटू पाहत आहेत. वेगवेगळी संसाधने शेतकऱ्यांच्या गळ्यात मारून कर्जबाजारी करण्याचे काम बारामतीकरांनी (शरद पवारांनी) सुरु केले आहे. शेतकऱ्यांच्या लुटीविरोधात शेतकरी संघटना कोल्हापूर, सांगली, लातूर, नांदेडसह संपूर्ण महाराष्ट्रात जनजागरण दौरा करून शेतकऱ्यांचे प्रबोधन करणार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील व शिवाजीराव नांदखिले यांनी बुधवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत दिली.

पाटील म्हणाले, राज्य सरकारने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, राज्य बँक, बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट या सर्वांनी मिळून महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा (ए.आय) वापर करून ऊस उत्पादन वाढेल ही भूमिका मांडली आहे. आतापर्यंत उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी पुष्कळ प्रयत्न करून व स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून एकरी १३० टनापर्यंत उत्पादन घेतले आहे. परंतु, साखर कारखान्यांनी उत्पादन खर्चाइतकाही भाव उत्पादकांना दिलेला नाही. त्यामुळे सोसायट्या, बँका, पतसंस्था, खाजगी सावकार यांच्या कर्जात शेतकरी अडकला आहे. 

या शेतकऱ्यांना पुन्हा एकरी ५० हजार रुपयांचे कर्ज देऊन वेगवेगळी साधने देऊन कर्जबाजारी करण्याचे काम खासदार शरद पवार यांनी सुरु केले आहे. राज्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांचे भेसळीमुळे प्रचंड नुकसान होत आहे. त्याचबरोबर वन्यप्राणी संरक्षण कायद्याने दरवर्षी सुमारे ४० हजार कोटींचे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे शेतकरी व शेतकऱ्यांचे पशुधन देशोधडीला लागले आहे. साखर कारखान्यांनी एस.एम.पी.चा कायदा बदलून एफ.आर.पी. आणला. त्यामुळे १४ दिवसात भाव मिळण्याचा फौजदारी अधिकार करण्याचा अधिकार गेला. त्याचबरोबर उपपदार्थांतील ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांना मिळत होती. तीही एफआरपीच्या कायद्यात गेली. या सर्व कारणांनी महाराष्ट्रातील शेतकरी हे देशोधडीला लागले आहेत.

यावेळी जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, लक्ष्मण पाटील, परशुराम माळी, आबासाहेब वावरे, अरुण पाटील, नानासाहेब काणे, अरूण क्षीरसागर, हणमंत पाटील, माणिक पाटील, शिवाजी दुर्गाडे, संदीप पाटील उपस्थित होते.

सहकारामुळे महाराष्ट्राची अधोगती

महाराष्ट्रापेक्षा दारिद्र्यात असलेले बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आसाम, ओडिसा ही राज्ये आपल्या पुढे गेली आहेत. शेजारच्या कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश या सर्वच राज्याने कितीतरी प्रगती केली आहे. महाराष्ट्राची अधोगती कशी काय झाली, त्याला महाराष्ट्रातील सहकार जबाबदार आहे, अशी टीका रघुनाथ पाटील यांनी केली.