शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
2
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
3
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
4
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
5
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
6
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
7
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
8
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
10
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
11
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
12
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
13
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
14
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
15
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
16
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
17
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
18
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
19
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
20
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli ZP: भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याची खेळी; शिंदेसेनेचेही दोन सदस्य महाविकास आघाडीसोबत रवाना

By संतोष भिसे | Updated: March 16, 2026 15:43 IST

बुधवारी थेट सभागृहात येणार, साऱ्यांचेच मोबाईल स्वीच ऑफ

संतोष भिसे

सांगली : जिल्हा परिषदेचे राजकारण तापवून महाविकास आघाडीचे सदस्य थंड हवा खाण्यासाठी रवाना झाले आहेत. अध्यक्षपदाची निवड बुधवारी (दि. १८) होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून दगाफटका होऊ नये, याची दक्षता घेताना पक्षनेत्यांनी सदस्यांना अज्ञातस्थळी नेऊन ठेवण्याची दक्षता घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदेसेनेने महाविकास आघाडी किंवा भाजपला पाठिंबा स्पष्ट केलेला नाही. मात्र पक्षाचे दोन्ही सदस्य आघाडीसोबत थंड हवेच्या ठिकाणी शनिवारीच रवाना झाले आहेत.

सत्तास्थापनेत भाजपला दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी आणि उद्धवसेनेचे सदस्य एकत्र आले आहेत. आणखी एका धक्कादायक घडामोडीत शिंदेसेनेचे आटपाडी तालुक्यातील दोघे सदस्यही आघाडीत सामील होत थंड हवेच्या ठिकाणी रवाना झाले आहेत. शुक्रवारी एका ट्रॅव्हल्समधून सारे सदस्य रवाना झाले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी (शरद पवार)चे जिल्हा पदाधिकारी आणि अजितराव घोरपडे गटाचा मिरज तालुक्यातील एक ज्येष्ठ पदाधिकारी आहे. रविवारी दुपारनंतर साऱ्यांचे मोबाईल स्वीच ऑफ झाले असून, ते संपर्काच्या बाहेर गेले आहेत.

सध्या दोन्ही राष्ट्रवादीचे सदस्य एका शहरात थांबून आहेत, तर काँग्रेसच्या सात सदस्यांचा गट समुद्रकिनारी मुक्कामाला आहे. उर्वरित चार सदस्य रविवारी सायंकाळपर्यंत सांगलीतच होते. त्यांनाही अज्ञातस्थळी रवाना होण्याचे आदेश पक्षनेत्यांनी दिले. त्यांच्यासाठी दोन गाड्यांची व्यवस्थाही करण्यात आली. त्यापैकी एका गाडीतून रात्री ते परजिल्ह्यात रवाना झाले आहेत.
दरम्यान, शिंदेसेनेने महाविकास आघाडी किंवा भाजपला पाठिंबा स्पष्ट केलेला नाही.

मात्र पक्षाचे दोन सदस्य आघाडीसोबत थंड हवेच्या ठिकाणी शनिवारीच रवाना झाले आहेत. शिंदेसेनेच्या पाठिंब्यासाठी भाजपने पाठपुरावा कायम ठेवला आहे. मात्र ‘आम्हाला गृहित धरून तुमचे संख्याबळ ३२ होते हे दाखवून द्या,’ असे आव्हान शिंदेसेनेचे नेते आमदार सुहास बाबर यांनी दिल्याचे समजते. या अटीवरच भाजपचे घोडे अडले आहे.

अज्ञातस्थळी असणाऱ्या सदस्यांना बुधवारी थेट जिल्हा परिषदेच्या सभागृहात आणले जाणार आहे. तत्पूर्वी मंगळवारी सायंकाळी त्यांना व्हीप, मतदान, पाठिंबा आदी प्रक्रियेची माहिती दिली जाणार आहे.

अजितराव घोरपडे-जयंत पाटील यांची बैठक

अध्यक्ष निवडीचे सारे डावपेच निश्चित करण्यासाठी शनिवारी सायंकाळी राष्ट्रवादी (शरद पवार)चे नेते आमदार जयंत पाटील व राष्ट्रवादी (अजित पवार)चे नेते माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यामध्ये सर्व सदस्यांना अज्ञातस्थळी नेण्याचे निश्चित झाले.

मंगळवारी पक्षश्रेष्ठींची बैठक

महाविकास आघाडीतील पक्षनेत्यांची बैठक मंगळवारी सांगलीत होणार आहे. त्यावेळी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीचे डावपेच निश्चित केले जातील. भाजपकडून केल्या जाणाऱ्या संभाव्य डावपेचांचा सामना कसा करायचा? याचीही व्यूहरचना केली जाईल.

सध्या आमचे आघाडीचे सर्व सदस्य बाहेरगावी रवाना झाले आहेत. शिंदेसेनेचे दोघे सदस्यही आमच्यासोबत असून, आमचे एकत्रित संख्याबळ ३८ वर पोहोचले आहे. जिल्हा परिषदेत आमचीच सत्ता येईल, यात कोणतीही शंका नाही. भाजपच्या चुकीच्या राजकारणाला पायबंद घालण्यासाठी आम्ही सारे एकत्र आलो आहोत. - अजितराव घोरपडे, माजी मंत्री

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli ZP: MVA strategizes to keep BJP out of power.

Web Summary : To prevent BJP's win in Sangli ZP election, MVA moved members to an undisclosed location, including two from Shinde's Sena. MVA leaders strategizing for the upcoming election.