शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

लग्नापूर्वी का बघितले जातात गुण, 36 गुण म्हणजे काय? मिळाले नाही तर...; जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 17:27 IST

लग्नापूर्वी 36 गुणांची जुळवाजुळव कशी होते आणि कुंडली जुळवताना आणखी कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला जातो, हे सोप्या शब्दात समजून घेऊया.

आपण लग्न ठरताना अथवा ठरवताना गुण मेलनासंदर्भात किंवा 36 गुणांसंदर्भात नक्कीच ऐकले असेल. खरे तर, हिंदू धर्मात लग्नाच्या वेळी वधू आणि वराची कुंडली जुळवून बघितली जाते. यात वधू आणि वराचे गुण जुळतात, की नाही, त्या आधारे विवाह निश्चित केला जातो. तर, या 36 गुणांची जुळवाजुळव कशी होते आणि कुंडली जुळवताना आणखी कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला जातो, हे सोप्या शब्दात समजून घेऊया.

हिंदू धर्मात कुंडली जुळवून बघणे आवश्यक - मुलगा आणि मुलगी दोघांचेहे वैवाहिक जीवन सुखी आणि शांततामय रहावे यासाठी कुंडली जुळवून बघितली जाते. ज्योतिष शास्त्रामध्ये (Astrology) विवाह जुळण्यासाठी एकूण 36 गुणांवर भाष्य करण्यात आले आहे. लग्नासाठी यांपैकी किमान 18 गुण जुळणे आवश्यक असते. तरच विवाह होऊ शकतो, अन्यथा विवाह अयोग्य असतो.

36 गुण कोणकोणते असतात -विवाहादरम्यान कुंडली मेलन करताना अष्टकूट गुण बघितले जातात. यात नाडीसाठी 8 गुण, भकूटचे 7 गुण, गण मैत्रीचे 6 गुण, ग्रह मैत्रीचे 5 गुण, योनी मैत्रीचे 4 गुण, ताराबलचे 3 गुण, वश्यचे 2 गुण आणि वर्णाचा 1 गुण जुळवून पाहिला जातो. अशा प्रकारे एकूण 36 गुण असतात. विवाहानंतर वर आणि वधू एकमेकांना अनुकूल असावेत, संतती सुख, धन संपत्तीत वृद्धी, दीर्घायुष्य असावे, यामुळेच दोन्ही पक्षाचे 36 गुण जुळवले जातात. मुहूर्तचिंतामणी ग्रंथामध्ये अष्टकुटात वर्ण, वश्य, तारा, योनी, ग्रह मैत्री, गण, भकूट आणि नाडीचा समावेश करण्यात आला आहे.

एवढे गूण जुळणे आवश्यक - लग्नासाठी वधू-वरांचे किमान 18 गुण जुळणे योग्य मानले जाते. एकूण 36 गुणांपैकी 18 ते 21 गुण जुळल्यास ही जुळणी मध्यम मानली जाते. तसेच अधिक गुण जुळल्यास त्याला शुभ विवाह मिलन म्हटले जाते. कुठल्याही वधू-वराच्या बाबतीत 36 गुण मिळणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार केवळ भगवान श्री राम आणि सीतेचेच 36 गुण जुळले होते. जर आपल्या कुंडलीचे मिलान 18 गुणांपेक्षा कमी म्हणजेच 17 गुण असेल तर लग्न करू नये. असे मानले जाते की, असा विवाह करणे टाळायला हवे. कारण असा विवाह सुखमय होऊ शकत नाही.

कुंडली जुळवताना 'ही' गोष्ट लक्षात ठेवणे महत्वाचे - जर कुणाच्या कुंटलीत मांगलीक दोष असेल, तर त्याचा विवाह मांगलिक कुंडली असलेल्या व्यक्तीसोबतच करायला हवा. सामान्य व्यक्तीसोबत त्याचा विवाह करू नये. जर असा विवाह झालाच तर तो त्यांच्या वैवाहीक जीवनासाठी योग्य मानला जात नाही. 

(टीप : वरील माहिती आणि सूचना या सर्व सामान्य मान्यतांवर आधारलेल्या आहेत. आम्ही याची पुष्टी करत नाही. यासंदर्भात निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

टॅग्स :Astrologyफलज्योतिषmarriageलग्नHinduismहिंदुइझमHinduहिंदू