शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

Relation : ‘या’ शुल्लक कारणांनी बिघडते पती-पत्नीचे नाते !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 16:32 IST

नात्यात प्रेम टिकण्यासाठी तसा दोघांनी प्रयत्न करायला हवा. यासाठी आपल्यात येणाऱ्या लहान-सहान गोष्टींकडे दुर्लक्ष करायला हवे. जाणून घेऊया कोणत्या शुल्लक कारणांनी दोघांत दूरावा निर्माण होतो.

-रवींद्र मोरे आपले नाते मजबूत ठेवण्यासाठी पती-पत्नी दोघेही खूप प्रयत्न करतात. त्यासाठी ते एकमेकांना गिफ्ट देतात, बाहेर फिरायला जातात मात्र बऱ्याचदा अगदी शुल्लक कारणांनी दोघांत भांडण-तंटे होतात आणि नात्यात दूरावा निर्माण होतात. नात्यात प्रेम टिकण्यासाठी तसा दोघांनी प्रयत्न करायला हवा. यासाठी आपल्यात येणाऱ्या लहान-सहान गोष्टींकडे दुर्लक्ष करायला हवे. जाणून घेऊया कोणत्या शुल्लक कारणांनी दोघांत दूरावा निर्माण होतो. * तुलना करणे  लग्नानंतर बरीच वर्ष झाल्यानंतर पती-पत्नी एकमेकांच्या चुका काढून दुसºयाशी तुलना करु लागतात. विशेषत: महिला आपल्या पतीच्या कामाच्या आणि पर्सनॅलिटीच्या बाबतीत आपल्या भावाशी किंवा अन्य व्यक्तीसोबत तुलना करते ज्यामुळे वेळोवेळी तंटे होतात.  * पैशांवर चर्चा  घर खर्चासाठी पैशांची आवश्यकता असते. मात्र जेव्हा महिला नेहमीच आपल्या पतीशी पैशांच्या बाबतीत चर्चा करीत असेल आणि पैशांनाच जास्त महत्त्व देत असेल तर नाते बिघडू शकते. नात्यात प्रेम टिकवून ठेवायचे असेल तर कधी पैशांना मध्ये येऊ देऊ नका.  * संताप करणे आॅफिसमध्ये काम करताना मानसिक तणाव येत असतो ज्याकारणाने बऱ्याचदा घरी आल्यानंतर पतीची कोणाशी बोलण्याची इच्छा होत नाही, मात्र महिला ही गोष्ट समजत नाही आणि पूर्ण दिवसाच्या सर्व गोष्टी आपल्या पतीला ऐकवायला बसते, ज्याकारणाने पती रागाच्या भरात काहीतरी बोलतो आणि भांडणाला सुरुवात होते. अशावेळी महिलांनी कोणत्या वेळेस कोणती गोष्ट करावी याचे भान ठेवावे, मात्र पुरुषांनाही आपल्या आॅफिसचा ताण घरापर्यंत न आणता आपल्या मुलांसाठी आणि पत्नीसाठीही वेळ काढावा.   * दिवसाची सुरुवात बहुतांश महिलेस सकाळी खूप कामाचा व्याप असतो, त्यात मुले व पतीसाठी ब्रेकफास्ट तयार करणे, स्वत:ची तयारी करणे आणि घराची साफसफाई करणे, मात्र या कामांसाठी तिच्याकडे पुरेसा वेळ नसतो, ज्यामुळे तिची चिडचिड होते. याच चिडचिडसोबत ती जेव्हा पतीशी बोलते तेव्हा दोघांत वाद निर्माण होतो.   * रुची संपणे नव्याचे नऊ दिवस असे म्हणतात, त्यानुसार लग्नाच्या सुरुवातीलाच दोघांत रुची दिसून येते मात्र लग्नाच्या काही वर्षानंतर दोघांत एकमेकांबद्दलची रुची कमी होऊ लागते. यामुळेच नात्यात दूरावा निर्माण होऊ लागतो.