शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

श्रीराम प्रॉपर्टीज: घरांच्या निर्मितीतून घडतो वारसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2025 18:17 IST

श्रीराम प्रॉपर्टीज दर्जा, नवकल्पना आणि ग्राहकांच्या समाधानाशी दृढ प्रतिबद्धतेसह पुण्यात आपला विसातर करीत आहे.

दक्षिण भारतातील अग्रगण्य निवासी रिअल इस्टेट विकासक म्हणून गेल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळापासून शहरी जीवनाची पुनर्व्याख्या करणाऱ्या श्रीराम प्रॉपर्टीजने (एसपीएल) मध्यम बाजारपेठ, तसेच देशातील उच्च मध्यम श्रेणीच्या क्षेत्रात एक प्रबळ शक्ती म्हणून ठसा उमटवला आहे. बंगळुरू, चेन्नई, कोलकाता, विशाखापट्टणम आणि कोईम्बतूरमध्ये मजबूत उपस्थितीनंतर आता श्रीराम प्रॉपर्टीज दर्जा, नवकल्पना आणि ग्राहकांच्या समाधानाशी दृढ प्रतिबद्धतेसह पुण्यात आपला विसातर करीत आहे. 

समुदायांची बांधणी, जीवन समृद्धी

श्रीराम प्रॉपर्टीजने भक्कम समाजभावना जोपासून हजारो लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. व्यावहारिकता आणि कार्यक्षमतेच्या पायावर श्रीराम प्रॉपर्टीजने आस्था, संवेदनशीलता आणि समावेशकतेचा स्पर्श देत तीस हजाराहून अधिक सदस्य असलेल्या कुटुंबाचे संगोपन साधले आहे. सुरक्षेला तसेच उत्तम रितीने डिझाईन केलेल्या सुविधा आणि टिकाऊपणाला प्राधान्य देत प्रत्येक प्रकल्प केवळ घरांपुरता मर्यादित न ठेवता चैतन्यमय आणि उत्तम परस्परसंबंध असलेल्या समुदाय म्हणून घडविण्यावर एसपीएलने भर दिला आहे. 

विश्वासाचा वारसा, नवकल्पना आणि उत्कृष्टता

विश्वास आणि पारदर्शकता आणि नियमनाच्या आधारस्तंभावर उभारलेले एसपीएल हे रिअल इस्टेट क्षेत्रातील अग्रगण्य नाव आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत एसपीएलने २६.५ दशलक्ष चौरस फूट क्षेत्रफळातील ४८ प्रकल्प पूर्ण केले असून ३८.४ दशलक्ष चौरस फूट क्षेत्रफळातील ३७ अतिरिक्त प्रकल्प निर्माणाधीन आहेत. शेअर बाजारात नोंदणी असलेल्या एसपीएलने टीपीजी एशिया, मित्सुबिशी कार्पोरेशन यांच्यासह अनेक जागतिक गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करून आपली आर्थिक विश्वसार्हता बळकट केली आहे. 

एसपीएल - एनएक्सटी अंतर्गत श्रीराम प्रॉपर्टीजने आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार आणि ग्राहक अनुभव उज्ज्वल करीत येत्या तीन वर्षांतील विकासाच्या नव्या पर्वाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. या स्ट्रॅटेजिक पुशमुळे अधिक विचारपूर्वक डिझाईन केलेली घरे ग्राहकांसाठी उपलब्ध होतील आणि नवनिर्मिती व मूल्यवर्धनाच्या माध्यमातून कंपनीला नवी उंची गाठता येईल. 

विचारपूर्वक डिझाईन आणि दर्जेदार बांधकाम

आधुनिक जीवनशैलीच्या गरजा पूर्ण करणाऱ्या अतिशय सुनियोजित, कार्यशील घरांची निर्मिती करणाऱ्या श्रीराम प्रॉपर्टीजमध्ये डिझाईन हे सौंदर्यानुभवापलीकडे पोहोचते. 'घरे जी तुमच्यात राहतात' (Homes that live in you) या ब्रँडमूल्य, विश्वास आणि तत्वज्ञानाशी एकनिष्ठ असलेली एसपीएल कल्पक कार्यशीलता आणि कालमर्यादा ओलांडून सदैव आकर्षक राहणाऱ्या शाश्वत डिझाईनमुळे प्रत्येक घरामध्ये आरामदायी आणि दीर्घकालीन मूल्याचे मूर्त स्वरूप लाभते. 

शीर्षस्थ बांधकाम तज्ज्ञांच्या भागीदारीतून गुणवत्तेच्या कठोर निकषांचे पालन करून एसपीएल टिकाऊपणा आणि उत्कृष्टता निश्चित करते. बांधकामापलीकडे जाऊन विक्रीनंतरच्या व्यापक सेवेतून ग्राहकांच्या समाधानाशी कंपनीची प्रतिबद्धता प्रतिबिंबित होते. त्यातून घरमालकाचे दीर्घकालीन मूल्य दृढ होते. विचारपूर्वक नियोजनाशी टिकाऊपणाची सांगड घालून उच्च दर्जाच्या बांधकामाद्वारे श्रीराम प्रॉपर्टीज रिअल इस्टेट क्षेत्रात सर्वोत्तमतेचे नवनवे मानबिंदू प्रस्थापित करीत आहे. 

आकांक्षा प्रतिबिंबित करणारी घरे

घर हे केवळ निवासाचे स्थान नाही तर तिथे जीवन उलगडत जाते, यावर श्रीराम प्रॉपर्टीजचा विश्वास आहे. कुटुंबकेंद्रीत निवासाच्या जागांची निर्मिती करताना कंपनी मोकळे आसमंत, खेळण्याच्या जागा, शाळा, इस्पितळे, शॉपिंग सेंटर्ससारख्या आवश्यक सुविधांशी सान्निध्यासारखे सुरक्षित आणि पोषक वातावरण प्रदान करते. 

व्यावसायिकांच्या गरजा लक्षात घेऊन कमी वेळात ऑफिस गाठता यावे, तसेच काम आणि वैयक्तिक आयुष्याचे योग्य संतुलन राखता यावे म्हणून एसपीएल धोरणात्मकदृष्ट्या आयटी हब्स आणि व्यावसायिक केंद्रांपाशी प्रकल्प विकसित करते. वैयक्तिक निवासस्थानांपलीकडे जाऊन श्रीराम प्रॉपर्टीज क्लब हाऊसेस, सामूहिक कार्यस्थळे, वेलनेस झोन्स आणि श्रीराम प्रॉपर्टीज समुदायकेंद्रीत डिझाईनचा पुरस्कार करते. 

भविष्याभिमुख विचार ठेवून श्रीराम प्रॉपर्टीजने प्रमुख सूक्ष्म बाजारपेठांमध्ये अग्रणी राहून आणि संपत्तीच्या लक्षणीय मूल्यवर्धनाला चालना देत नव्या आणि आजवर न आजमावलेल्या प्रदेशांमध्ये झपाट्याने विस्तार केला आहे. सुलभतेची दर्जाशी सांगड घालून उच्च दर्जाची घरे व्यवहार्य दरात उपलब्ध करून देत एसपीएलने इच्छुक खरेदीदारांसाठी घराची मालकी वास्तवात उतरविली आहे. 

विस्तारणारी क्षितिजेः पुणे आणि पलीकडे

धोरणात्मक विकास योजनेचा भाग म्हणून श्रीराम प्रॉपर्टीजने पुढच्या तीन वर्षांसाठी दुप्पट विक्री, तिप्पट महसूल आणि चौपट नफ्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. पुण्यात उंदरी येथील १४ एकर क्षेत्रफळातील मिश्र वापर विकास प्रकल्पाच्या पदार्पणासह एसपीएल पश्चिमेच्या बाजारपेठेत विस्ताराचा एक महत्त्वाचा टप्पा गाठत आहे. वेगाने विकसित होत असलेल्या या भागात श्रीराम प्रॉपर्टीजच्या उत्कृष्ट दर्जाचा आणि नवकल्पनेचा ठसा उमटणार आहे. 

निवासी आणि व्यावसायिक जागा सहजपणे एकरूप करून श्रीराम प्रॉपर्टीज विकसित होणारी शहरी जीवनशैली स्वीकारणारा गतिमान आणि भविष्यासाठी सज्ज समुदाय घडवित आहे. 

विश्वास वारसा, दर्जा आणि शाश्वत जीवनाशी प्रतिबद्धता सांगणारी श्रीराम प्रॉपर्टीज मधील गुंतवणूक ही घर खरेदी करणाऱ्यांसाठी घराच्या मालकी हक्कापलीकडची आहे. 

एसपीएलचा प्रत्येक प्रकल्प विश्वसनीयता, मूल्य आणि उत्कृष्टतेचे आदर्श संतुलन साधून आकांक्षांच्या पूर्ततेसाठी विचारपूर्वक डिझाईन केलेला असतो. दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या मजबूत नावलौकिकामुळे घर खरेदी करणाऱ्यांचे स्वप्न वास्तवात साकारण्यात श्रीराम प्रॉपर्टीज विश्वसनीय भागीदार ठरली आहे.

टॅग्स :Real Estateबांधकाम उद्योग