शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

शहरे नव्हे, उपनगरांमध्ये घरे वेगाने होताहेत महाग; अनेक मोठे गृहप्रकल्प आणि कनेक्टिव्हिटीच्या उत्तम सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 08:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : देशातील रिअल इस्टेट बाजार सध्या तेजीत आहे. विशेष म्हणजे प्रमुख शहरांच्या तुलनेत त्यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशातील रिअल इस्टेट बाजार सध्या तेजीत आहे. विशेष म्हणजे प्रमुख शहरांच्या तुलनेत त्यांच्या लगतचा परिसर, तसेच जवळच्या उपनगरांमध्ये घरांच्या किमती वेगाने वाढत आहेत. हा बदल प्रामुख्याने मागील ६ वर्षांत झालेला आहे. रिसर्च फर्म ॲनारॉकने सात शहरांच्या केलेल्या पाहणीतून ही बाब समोर आली आहे.

ॲनारॉक गुपचे उपाध्यक्ष संतोष कुमार म्हणाले की, मागील सहा वर्षांत शहरांच्या तुलनेत लागून असलेल्या परिसरात चांगली कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणाऱ्या सुविधा मिळाल्या आहेत. लोकांसाठी चांगले राहणीमान हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा ठरू लागला आहे. त्यामुळे बिल्डरांनी शहरांना लागून असलेल्या परिसरात मोठमोठे गृहप्रकल्प उभारण्याचे काम सुरू केले आहे. आता आलिशान प्रकल्पांसाठी लागणारी मोठी जागा इथे सहजपणे उपलब्ध होत आहे. 

कोलकाता शहराजवळ असलेल्या जोकामध्ये घरांच्या किमती मागील सहा वर्षात ५१ टक्के वाढल्या आहेत तर चेन्नईलगत असलेल्या नवलूरमध्ये किमती ५४ टक्के वाढल्या आहेत. 

पनवेल, विरार ५८% महागnमुंबई महानगर क्षेत्राचा विचार केला तर पनवेलमधील जागांच्या किमती सहा वर्षांत ५८ टक्के वाढल्या आहेत. २०१९ मध्ये ५,५२० रुपये प्रतिचौरस फूट असलेले दर २०२४ मध्ये ८,७०० रुपयांवर पोहोचले आहेत.nविरारमध्येही किमती ५८ टक्के वाढल्या आहेत. सहा वर्षांपूर्वी ४,४४० रुपये प्रतिचौरस फूट इतके असलेले दर आता ६,८५० रुपयांवर पोहोचले आहेत.

वाकड २७%; वाघोली ३७% महागnपुण्याजवळ असलेल्या वाकडच्या घरांच्या किमती २७ टक्के वाढल्या आहेत. सहा वर्षांपूर्वी ६,५३० रुपये प्रतिचौरस फूट इतके असलेले दर आता ८,३०० रुपयांवर पोहोचल्याचे दिसून आले आहे. nवाघोलीतील घरे सहा वर्षांत ३७ टक्के महाग झाली आहेत. २०१९ मध्ये ४,८२० रुपये प्रतिचौरस फूट असलेले दर २०२४ मध्ये ६,६०० रुपयांवर पोहोचले आहेत.

बंगळुरूजवळचे गुंजूर ६९% महागबंगळुरुलगत असलेल्या गुंजूरमध्ये घरांच्या किमती तब्बल ६९ टक्क्यांनी वाढल्या आहेत. २०१९ मध्ये ५,०३० रुपये प्रतिचौरस फूट असलेले दर २०२४ मध्ये वाढून ८,५०० रुपयांवर पोहोचले आहेत. तसेच थन्नीसांद्रा परिसरातील दरही ६२ टक्के वाढले आहेत. सहा वर्षांपूर्वी ५,१७५ रुपये प्रतिचौरस फुटांवर असलेले दर आता ८,४०० रुपयांवर पोहोचले आहेत.

टॅग्स :Real Estateबांधकाम उद्योग