शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कुंभार्ली घाटात बनावट ई - पास प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:34 IST

चिपळूण : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा बंदी असल्याने ई - पासच्या माध्यमातून वाहतूक करणाऱ्यांची काटेकोरपणे तपासणी केली जात आहे. अशातच ...

चिपळूण : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा बंदी असल्याने ई - पासच्या माध्यमातून वाहतूक करणाऱ्यांची काटेकोरपणे तपासणी केली जात आहे. अशातच चिपळूण - कऱ्हाड मार्गावरील कुंभार्ली घाटातील तपासणी नाक्यावर बनावट ई - पासच्या आधारे प्रवास करताना साेमवारी गाडीचालक पुष्पक नरसिंग शिंदे (वय २४, रा. नांदिवसे, राधानगर, सध्या खेर्डी - दत्तवाडी, चिपळूण) तसेच गाडीचा मालक रोशन सुरेश शिंदे (रा. कळवणे) व सहचालक रेवण दत्तात्रय अडसुळ, (२३, दादर, गावठाण चिपळूण) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोराेनाचा संसर्ग वाढल्याने १५ एप्रिलपासून प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. या लॉकडाऊनमध्ये नागरिकांच्या संचारावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा बंदी लागू करण्यात आली आहे. आंतर जिल्हा प्रवासासाठी ई - पास सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु, ई - पास सुविधेचा काही लोकांनी गैरफायदा घेतल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा लोकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत.

कुंभार्ली तपासणी येथे पोलीस उपनिरीक्षक धनश्री करंजकर व अलोरे पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस फौजदार विजय केतकर, पोलीस हवालदार स्वप्निल साळवी, होमगार्ड यशवंत धांगडे, आदित्य कुळे, आरोग्य सेवक मोहिरे, शिक्षक दत्ताराम निर्मल, विलास मायनाक, आदी जिल्ह्यात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांची तपासणी करीत होते. त्यावेळी कऱ्हाड बाजूकडून रत्नागिरी जिल्ह्यात येणारी इर्टिका गाडी तपासणीसाठी थांबविण्यात आली. गाडीतील व्यक्तीकडे ई - पासची मागणी करून पासवरील क्युआर कोड स्कॅन केला असता, तो बनावट असल्याचा संशय आला. याप्रकरणी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलची मदत घेतली असता तो पास बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक धनश्री विष्णू करंजकर यांनी तक्रार दिली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.