शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

मठ येथे दोन गटात वाद, गावात तणाव

By admin | Updated: August 30, 2015 22:46 IST

पोलिसांनी आज घडलेल्या घटनेवर रितसर तक्रार दाखल करुन योग्य ती कारवाई दोघांवरही केली जाईल, असे सांगताच ग्रामस्थ आक्रमक झाले. सा

लांजा : गेली अनेक वर्षे देवळावरून वाद निर्माण झालेले असताना गावविरोधी असलेल्या पार्टीने हॉटेलचे साहित्य देवळात ठेवल्याचे पाहून गावकऱ्यांनी ते बाहेर फेकून दिल्याने दोन पार्टीत वाद निर्माण होऊन त्याचे हाणामारीत रुपांतर झाले. अशाचवेळी मठ गावातील शेकडो ग्रामस्थ या घटनेविरोधात मोठ्या संख्येने जमल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अशावेळी पोलिसांनी दोन्ही पार्टीला पोलीस स्थानकात आणून त्यांच्या विरोधात कारवाईचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते.मठ गावातील श्री भवानी सोमेश्वर आणि जाकादेवी या मंदिरावरून संपूर्ण गाव विरूध्द एक व्यक्ती असा गेली १२ वर्षे वाद चालू आहे. अनेकवेळा या विषयावरून लांजा पोलीस स्थानकामध्ये परस्परविरोधी तक्रारीही दाखल करण्यात आल्या. मात्र, हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये असल्याने यावर शांततेसाठी पोलीस काही ना काही तोडगा काढत. दरम्यान शनिवारी येथे रुपे लावली. कारण या देवळाचा एक्का सोमवारी असल्याने साफसफाईचे काम सुरू होते. याच अनुषंगाने जाकादेवीच्या देवळातही नारळ देण्याचे ग्रामस्थांनी ठरवले होते. मात्र, या देवळात विरोधी पार्टी असलेल्यांनी आपल्या हॉटेलचे साहित्य देवळात ठेवल्याचे आढळून आले. त्यावेळी ग्रामस्थांनी ते बाहेर फेकून दिले. त्यावरून वादाला सुरुवात झाली.साहित्य बाहेर फेकल्याचे पाहून गावविरोधी पार्टी असलेल्या शैलेश अनंत लिंगायत याने ग्रामस्थांना शिव्या देण्यास सुरुवात केली. तेवढ्यात एक सोड्याची बाटली देवळाच्या बाजूने फेकण्यात आली. मात्र, त्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शैलेश याच्या हॉटेल मधीलच बाटल्या फेकण्यास सुरुवात केली. यामध्ये शैलेश याच्या मुलाच्या पायाला दुखापत झाली. हॉटेलात गिऱ्हाईक म्हणून आलेल्या विकास कांबळे यांच्या नाकाला दुखापत झाली. त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. देवळावरून वाद निर्माण झाल्याचे वृत्त मठ गावात समजताच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमले होते. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलीसपाटलांनी याबाबतची खबर लांजा पोलीस स्थानकाला दिल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोन्ही गटातील लोकांना पोलीस स्थानकात आणले. गावपार्टीच्या काही मोजक्याच लोकांना पोलीस स्थानकामध्ये बोलावले असताना मठचे शेकडो लोक स्थानकात जमा झाले. पोलीस निरीक्षक एच. आर. डंगारे यांनी परिस्थितीचे भान ठेऊन ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले. यावेळी ग्रामस्थांनी याच देवळाबाबत धर्मादाय आयुक्तांनी निर्णय गावाच्या बाजूने दिला असल्याचे सांगितले. विरोधी पार्टीने आपण याबाबत अपिल केले असल्याचे सांगितले. यावर पोलिसांनी आज घडलेल्या घटनेवर रितसर तक्रार दाखल करुन योग्य ती कारवाई दोघांवरही केली जाईल, असे सांगताच ग्रामस्थ आक्रमक झाले. सायंकाळी उशिरापर्यंत जबाब दाखल करण्याचे काम सुरु होते. (प्रतिनिधी)