शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

दहा उमेदवारांचे अर्ज अवैध

By admin | Updated: September 30, 2014 00:13 IST

महत्त्वाचे उमेदवार ‘सेफ’: उद्या उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरलेल्या जिल्ह्यातील ६५ उमेदवारांपैकी दहा उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले असून, ५५ उमेदवार सध्या निवडणूक रिंगणात आहेत. बुधवारी (दि. १ ) उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत असल्याने नेमक्या लढती कशा आणि कोणामध्ये होणार, हे त्याच दिवशी स्पष्ट होणार आहे.अर्ज भरण्यास २० आॅक्टोबरपासून प्रारंभ झाला. मात्र, सुरुवातीचे तीन दिवस काही पक्षांचे उमेदवार निश्चित न झाल्याने अर्ज भरले गेले नाहीत. मंगळवार (दि. २३) पासून ही सुरुवात झाली. त्यानंतर बुधवारी (दि.२४) जिल्ह्यातील तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. दि. २५ रोजी पाच , २६ रोजी १७, तर २७ रोजी तब्बल ४१ अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे दापोली मतदारसंघात १८ उमेदवार, गुहागरमध्ये आठ उमेदवार, चिपळूणमध्ये १३ उमेदवार, रत्नागिरीमध्ये १३ उमेदवार आणि राजापूरमध्ये १२ उमेदवारांनी अर्ज भरले.आज, सोमवारी या सर्व अर्जांची छाननी त्या-त्या प्रांत कार्यालयात करण्यात आली. यावेळी रत्नागिरीतील अ‍ॅड. बाबा परुळेकर (भाजप), गुहागरमधून प्रशांत शिरगावकर (भाजप), सुरेश कातकर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), दापोलीतील किशोर देसाई (राष्ट्रवादी), प्रवीण कोलगे (शेकाप), श्रद्धा दळवी (शिवसेना), बाळासाहेब बेलोसे (काँग्रेस), चिपळूणमधील अशोक जाधव (काँग्रेस) आणि राजापुरातील रूपेश गांगण (भाजप), संदीप कांबळे (रिपाइं) यांचे अर्ज अवैध ठरले आहेत.आता दापोली मतदारसंघातील १५, गुहागरामधील ६, चिपळूणमधील १२, रत्नागिरीतील १२ आणि राजापुरातील १०, असे एकूण ५५ उमेदवार रिंगणात आहेत. १ आॅक्टोबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असल्याने यापैकी कोण माघार घेणार आणि कोण निवडणूक लढविणार, हे चित्र स्पष्ट होणार असल्याने सर्वांचेच लक्ष या दिवसाकडे लागले आहे. (प्रतिनिधी)४पाचही मतदारसंघांतील प्रमुख असे सर्वच उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. कोणत्याही महत्त्वाच्या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरलेला नाही. दापोलीत किशोर देसाई यांनी राष्ट्रवादीकडून आणि अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यातील पक्षाचा अर्ज बाद झाला असला तरी अपक्ष म्हणून ते रिंगणात आहेत.