शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

मार्गताह्मणेत गावठी हातभट्टीवर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:33 IST

लाखोंचा मुद्देमाल जप्त : तिघांना अटक; भट्ट्याही केल्या उद‌्ध्वस्त लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : तालुक्यातील मार्गताह्माणे येथील गावठी हातभट्टीवर ...

लाखोंचा मुद्देमाल जप्त : तिघांना अटक; भट्ट्याही केल्या उद‌्ध्वस्त

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : तालुक्यातील मार्गताह्माणे येथील गावठी हातभट्टीवर स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने छापा टाकत सुमारे एक लाख ८५ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, तिघांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे, तर हातभट्ट्यांना थेट आग लावून उद‌्ध्वस्त करण्यात आले आहेत. रविवारी ही कारवाई करण्यात आली.

तालुक्यातील मार्गताह्माणे येथे बेकायदा गावठी हातभट्टी सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला प्राप्त झाली होती. माहितीची सत्यता पडताळल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने रविवारी संबंधित ठिकाणी थेट छापा टाकून कारवाईला सुरुवात केली. या कारवाईत तब्बल एक लाख ८५ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून सुधीर घाणेकर, संदीप घाणेकर आणि गणेश घारे (सर्व मार्गताह्माणे) या तिघांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत तसेच हातभट्टीचे सर्व साहित्य जागेवरच आग लावून उद‌्ध्वस्त करण्यात आले.

चिपळूण तालुक्यातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई ठरली असून, स्थानिक गुन्हा अनवेशन पथकाने थेट ही कारवाई केल्याने बेकायदा गावठी हातभट्टी दारुवाल्यांचे धाबेच दणाणले आहेत. मार्गताह्माणेत यापूर्वीही उत्पादन शुल्क विभागाने अशीच मोठी कारवाई केली होती. तसेच चिपळूण वालोपे येथेही काही दिवसांपूर्वी कारवाई करण्यात आली होती.