शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दुग्धव्यवसाय वाढीसाठी जनावरांच्या वैरणीचा प्रश्न मार्गी; पण...

By admin | Updated: July 30, 2014 23:47 IST

रत्नागिरी : शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेतकऱ्यांचे जीवनमान

रत्नागिरी : शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न सुरू आहेत. दुधाळ जनावरांच्या वाटपाबरोबर जनावरांच्या वैरणीचा प्रश्न सोडविण्यासाठी चाऱ्यांचे ठोंब वितरीत करण्यात येत आहेत. पण, असे असले तरीही दुग्ध व्यवसायाची फार मोठी प्रगती झालेली नाही.वैरण विकास व खाद्य योजनेंतर्गत शेतकरी, सहकारी संस्था, बचत गट, मंडळांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. १ हेक्टर व त्यापेक्षा जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. ३० हजार ते १ लाखापर्यंतचे अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी आतापर्यंत सुमारे ७० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी प्रस्ताव पाठविले आहेत.यावर्षी जयवंत, यशवंत जातीचे गवताचे सुमारे ६ लाख ठोंबांचे वितरण करण्यात येणार आहे. पडिक जमिनीबरोबर शेताच्या बांधावर किंवा कलमांच्या बागेत आंतरपीक म्हणून चाऱ्याचे उत्पादन घेता येऊ शकेल. उत्पादित चारा गुरांसाठी ठेऊन अधिकचा चारा विकता येऊ शकेल. साडेतीन रूपये किलो दराने चारा विक्रीतून शेतकऱ्याला अर्थार्जन मिळू शकते. तसेच निकृष्ट चाऱ्यावर प्रक्रिया करून कमी खर्चात व उपलब्ध साहित्याचा वापर करून उत्कृष्ट चारा निर्मितीचे प्रात्यक्षिकांव्दारे शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. त्यासाठी लागणाऱ्या युरिया, मीठ, झारी, प्लास्टिक कापड, माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले आहे. अशिय सोपी, कमी खर्चिक, उपलब्धतेनुसार चारा निर्मिती करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.जनावरांच्या मलमुत्रापासून पैदास होणाऱ्या डासांवर नियंत्रण मिळविण्यासाठी उरलेला चारा, शेण, मूत्र योग्य प्रमाणात एकत्र करून सेंद्रिय खत निर्मिती करता येऊ शकते. त्यासाठी लागणारा डिंक पोजर शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आला आहे. एकूणच शेतकऱ्यांना शेती व दुग्धपालन व्यवसायाव्दारे अन्य छोटेमोठे जोडधंदे करून अर्थार्जन करणे सोपे होत आहे.सध्या जिल्ह्यात एक लाख ९० हजार ५५६ मेट्रिक टन हिरवा चारा उपलब्ध आहे. तसेच २२ हजार ७०४ मेट्रिक टन सुका चारा उपलब्ध आहे. यावर्षी पाऊस जुलैपर्यंत लांबला होता. परिणामी शेतकऱ्यांमध्ये गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु आषाढी एकादशीपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा चाऱ्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. सध्या चारा मुबलक स्वरूपात उपलब्ध असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुभाष म्हस्के यांनी सांगितले. (प्रतिनिधी)