शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

‘पॅसेंजर’चा प्रवास दहा रुपयांनी महाग

By admin | Updated: June 24, 2014 01:41 IST

आरक्षित तिकिटासाठी आधी ८५ ऐवजी आता ९५ रुपये मोजावे लागणार

रत्नागिरी : रेल्वे प्रवासी भाड्यात १४.२ टक्के वाढ घोषित झाल्याने कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या सर्वच गाड्यांच्या प्रवास भाड्यात येत्या २५ जूनपासून वाढ होत आहे. त्यामुळे रत्नागिरी-दादर पॅसेंजरने प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला आता अधिक दहा रुपयांची चाट बसणार आहे. या गाडीचे साधारण बोगीचे प्रवासी भाडे आता ७० रुपयांवरून ८० रुपये झाले आहे, तर आरक्षित तिकिटासाठी आधी ८५ ऐवजी आता ९५ रुपये मोजावे लागणार आहेत. एक्स्प्रेस गाड्यांच्या दरात २0 ते ३५ रूपयांची वाढ झाली आहे. रत्नागिरीतून दररोज पहाटे ५.३० वाजता सुटणारी रत्नागिरी-दादर पॅसेंजर ही रेल्वे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाशांमध्ये लोकप्रिय आहे. ही रेल्वे दुपारी २.३० ते ३ वाजता दादरला पोहोचते, तर ३.३० ते ४ वाजता पुन्हा रत्नागिरीकडे निघते. रत्नागिरी ते मुंबई जाण्यासाठी एस. टी. बसच्या तिकीट दराच्या तुलनेत रत्नागिरी पॅसेंजर रेल्वेचे दर काही पटीने कमी असल्याने सर्वसामान्यांसाठी ही पॅसेंजर रेल्वे ‘आधार’ ठरली आहे. रत्नागिरीहून मुंबईला एस. टी. बसने जाण्यासाठी साध्या रातराणी बसचे तिकीट ४४१ रुपये, तर निमआराम बसचे भाडे ५०७ रुपये आहे. या एका तिकिटाच्या रकमेत चारजणांचे कुटुंब रत्नागिरी-दादर पॅसेंजरने नवीन भाडेवाढीनंतरही मुंबईत जाऊ शकते, अशी स्थिती आहे. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या व कोकणवासीयांना उपयुक्त ठरणाऱ्या अन्य गाड्यांच्या तिकीट दरातही वाढ होत आहे. सावंतवाडी - दादर राज्यराणी एक्सप्रेसचे प्रवासी भाडे शयनयानसाठी ४० ते ४५ रुपयांनी वाढले आहे. या गाडीचे रत्नागिरी ते दादर शयनयान भाडे ३० रुपयांनी वाढले आहे, तर द्वितीय श्रेणीचे प्रवासभाडे १५ रुपयांनी महागले आहे. कोकणकन्या एक्सप्रेसचे रत्नागिरी ते छत्रपती शिवाजी टर्मिनस शयनयान भाडे ३५ रुपयांनी वाढले असून, द्वितीय श्रेणीचे भाडे २० रुपयांनी महागले आहे. जनशताब्दी एक्सप्रेसचे रत्नागिरी ते दादरकरिता ए. सी.चेअर कार प्रवासी भाडे ९० रुपयांनी वाढले आहे, तर द्वितीय श्रेणी प्रवासभाडे ४५ रुपयांनी वाढले असून ते आता २१० रुपये झाले आहे. (प्रतिनिधी)