शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर शहरातील लसीकरणासाठी नगर परिषदेचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:32 IST

राजापूर : शहरात दुसऱ्या डोसच्या लसीकरणासाठी होणारी गर्दी विचारात घेता, शहरातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत नगर परिषदेकडून नियोजन करण्याबाबत तहसीलदार प्रतिभा ...

राजापूर : शहरात दुसऱ्या डोसच्या लसीकरणासाठी होणारी गर्दी विचारात घेता, शहरातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत नगर परिषदेकडून नियोजन करण्याबाबत तहसीलदार प्रतिभा वराळे व तालुका आरोग्याधिकारी डॉ. निखिल परांजपे यांच्याशी चर्चा करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे यांनी दिली आहे.

राजापूर शहरातील ग्रामीण रुग्णालय व राजापूर हायस्कूल या दोन लसीकरण केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. यामध्ये १८ ते ४४ वर्षे वयोगटासह ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाचे शेड्युल तयार केले जात आहे. मात्र, लसीकरण करताना सध्या मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यातच ज्यांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. ज्या दिवशी लसीकरणाचे शेड्युल येते, त्या दिवशी मोठ्या प्रमाणावर या लसीकरण केंद्रांवर गर्दी होत आहे.

याबाबत मंगळवारी नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे यांनी राजापूरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. निखिल परांजपे, गटविकास अधिकारी सागर पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. यावेळी राजापूर नगर परिषोच्या हद्दीतील नागरिकांच्या लसीकरणाच्या नियोजनाची जबाबदारी नगर परिषदेकडे द्यावी, अशी मागणी केल्याचे अ‍ॅड. खलिफे यांनी सांगितले. याबाबत निश्चितच निर्णय घेतला जाईल, असेही यावेळी तहसीलदार वराळे यांनी सांगितले.

राजापूर शहरात लसीकरणाबाबत नियोजन करताना ते प्रभागनिहाय करून ज्यांनी पहिला डोस घेतला आहे, त्यांची मुदत संपत आहे, त्यांना प्राधान्याने लस देण्याबाबत नियोजन केले जाणार आहे. शहरातील सर्व प्रभागांतील ज्येष्ठ नागरिकांची यादी तयार करून त्याप्रमाणे नोंदणी करून त्यांना संपर्क साधून लसीकरण केंद्रावर बोलावून लस देण्याबाबत नियोजन करण्याचा मानस असल्याचे अ‍ॅड. खलिफे यांनी सांगितले. यासाठी आरोग्य विभागानेही सहकार्य करण्याची तयारी दर्शविल्याचे अ‍ॅड. खलिफे यांनी सांगितले.