शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
2
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
3
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
4
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
5
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
6
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
7
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
8
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
9
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
11
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
12
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
13
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
14
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
15
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
16
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
17
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
18
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
19
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
20
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
Daily Top 2Weekly Top 5

मेरिटाईम युनिव्हर्सिटी रत्नागिरीतच : गीते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2016 00:53 IST

उद्योग वाढणार : कागद कारखान्यासह रिफायनरीही

रत्नागिरी : पेपरमिल, रिफायनरी उद्योग आणि मेरिटाईम युनिव्हर्सिटी रत्नागिरीतच राहावी, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे केंद्रीय उद्योगमंत्री अनंत गीते यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या दक्षता समितीच्या बैठकीसाठी आज ते रत्नागिरीत आले असता, त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला.
ते म्हणाले की, पेपरमिल लोटे परशुराम येथे आणण्याचा आपला प्रयत्न आहे. कालावधी वाढल्याने याचा खर्च आता ३०० कोटींवरून ४०० कोटींवर गेल्याने आता हा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आले आहे. सरकारी पेपर मिलबरोबरच खासगी पेपरमिल आणण्याचाही आपला प्रयत्न आहे.
मेरिटाईम युनिव्हर्सिटीही रत्नागिरीत आणण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा दापोलीत उपलब्ध असल्याने हे विद्यापीठ दापोलीत (उसगाव) येथे व्हावे, असे आपल्याला वाटते. यासाठी केंद्राकडून ५० कोटी निधी उपलब्ध आहे. मात्र, जयगडमध्ये जेएसडब्ल्यू कंपनीने यासाठी २५ एकर जागा दिल्याने जयगडमध्ये हे विद्यापीठ होण्याबाबत विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
तवसाळ - पडवे (ता. गुहागर) येथे रिफायनरी उद्योगासाठीही केंद्राकडून हिरवा कंदील मिळाल्याने ६० दशलक्ष टनाचा हा उद्योगही रत्नागिरीत येणार आहे. यात भारत पेट्रोलिअम, इंडियन आॅईल कॉर्पोरेशन आणि हिंदुस्थान लिव्हर या तीन कंपन्यांचा सहभाग असणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या दक्षता समिती बैठकीत त्यांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला. ते म्हणाले की, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सर्व योजना जिल्ह््यात चांगल्याप्रकारे राबविल्या जात आहेत. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना २ वर्षे ठप्प होती. पण आता ती सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय पेयजल योजनेची ५३३ कामे प्रगतीपथावर आहेत. त्यासाठी आवश्यक ३८ कोटी रूपये केंद्राकडून उपलब्ध करून दिले जातील. डिसेंबरअखेर ८८ किलोमीटरची कामे १०० टक्के कामे पूर्ण होतील.
यावेळी खासदार विनायक राऊत उपस्थित होते. ते म्हणाले की, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील निधीचा योग्य विनीयोग होत असल्याने साथीच्या आजारांना पायबंद बसला आहे. शासकीय जिल्हा रूग्णालयाचे नव्याने केलेले बांधकाम पडत आले आहे. याबाबत आपण आरोग्य संचालकांशी चर्चा केली असून, याबाबत लवकरच कार्यवाही होणार आहे. लवकरच रिक्त पदांबाबत तसेच तेथील आरोग्य सेवेच्या कमतरतेबाबत पूर्तता होईल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)


वीज ग्राहकांसाठी योजना
महावितरणच्या संदर्भात तक्रारी वाढत्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना चांंगली सेवा मिळावी यासाठी केंद्राच्या शहरी भागासाठी आयपीडीएस आणि ग्रामीण भागासाठी दिनदयाळ ग्रामज्योती योजना राबविण्यात येणार आहेत. यासाठी अनुक्रमे ३८ कोटी आणि ५६ कोटी इतका निधी मंजूर झाला आहे. रत्नागिरी, चिपळूण, दापोली, खेड अशा पाच शहरांमध्ये ट्रान्समिशन सेंटर उभारण्यात येणार आहेत. यासाठी ऊर्जामंत्र्यांसोबत बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.


केंद्रीय मंत्री म्हणाले...
आशांचे मानधन वाढवून ते दरमहा ५००० रूपये करावे, असा ठराव आजच्या आढावा बैठकीत झाला.
तळे, रामपूर, साखरपा या तीन ठिकाणी नवीन आरोग्य केंद्रे उभारणार तसेच जिल्ह््यातील पाच आरोग्य केंद्राचे नुतनीकरण करणार.
रिक्त पदे भरण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या असून, आजच्या बैठकीत तसा ठराव करण्यात आला.
केंद्र सरकारच्या दोन योजनांसाठी महावितरणला १०० कोटी देण्यात येणार आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठीही दक्षता समिती स्थापन करण्यात येणार आहे.
जिल्ह््यातील १७ धनगरवाड्यांवर अजूनही वीज पोहोचलेली नाही. तिथे सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज पुरविणार आहोत.
बैठकांना विविध विभागांचे अधिकारी उशिरा येतात. याबाबतही आपण सक्त सूचना दिल्या आहेत.