शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘गॅस स्टँपिंग’साठी आता जूनअखेरची डेडलाईन

By admin | Updated: June 23, 2016 01:19 IST

नीता शिंदे : केरोसीन उचल करणाऱ्या गॅस ग्राहकांना अनिवार्य

रत्नागिरी : उच्च न्यायालयाने गॅस जोडणीची नोंद करणे अनिवार्य केले आहे. काही शिधापत्रिकांवर गॅस जोडणी शिक्का नसल्याचा गैरफायदा घेत ग्राहक केरोसीनची उचल करतात. ही शक्यता लक्षात घेत जिल्हा पुरवठा विभागाकडून सिलिंडरधारकांना ‘गॅस स्टँपिंग’ पूर्ण करून घेण्यासाठी जून अखेरची मुदत देण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी नीता शिंदे - सावंत यांनी दिली.
शासनाने सप्टेंबर २०१५पासून गॅस जोडणी असलेल्या शिधापत्रिधारकांना केरोसीन बंद केले आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ३१ मार्च २०१६पर्यंत ‘गॅस स्टँम्पिंग मोहीम’ पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राज्यामधील गॅस एजन्सींकडून गॅस जोडणीधारकांची यादी प्रत्येक जिल्ह््यातील पुरवठा कार्यालयाने मागवली होती.
राज्य शासनाने सप्टेंबर २०१५पासून गॅस जोडणी असलेल्या शिधापत्रिधारकांना केरोसीन बंद केले आहे. रत्नागिरी जिल्ह््यात एकूण ४,२३,९६८ शिधापत्रिकाधारक असून, ‘गॅस स्टँम्पिंग मोहीम’ पूर्ण झाल्यानंतरच यापैकी किती ग्राहकांकडे गॅस जोडणी आहे, हे निश्चित होणार आहे.
यासाठी जिल्ह््यातील रेशनदुकानदारांकडे गॅस एजन्सीकडून प्राप्त झालेली गॅस जोडणीधारकांची यादी देण्यात आली असून, त्यानुसार आता ‘गॅस स्टँम्पिंग’ची जबाबदारी रेशनदुकानदारांकडे देण्यात आली आहे. त्यामुळे आता शिधापत्रिकेवर गॅस सिलिंडरची नोंदणी न केलेल्या ग्राहकांचे केरोसीन थांबविणे शक्य होणार आहे. शिधापत्रिकेवर गॅस जोडणी शिक्का नसल्याचा गैरफायदा घेत केरोसीनची उचल केल्यास संबंधित ग्राहकावर कारवाई होणार असल्याने आपोआपच या प्रकारावर अंकुश येणार आहे.
ज्या ग्राहकांनी अजूनही शिधापत्रिकेवर गॅस नोंदणी केलेली नाही, त्यांनी संबंधित रेशनदुकानदाराकडे ३० जूनपर्यंत ही नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नीता शिंदे - सावंत यांनी केले आहे. (प्रतिनिधी)


आवाहन : नोंदणी त्वरित करावी
जिल्ह््यात ग्राहकांकडे गॅसजोडणी असूनही त्यांनी रेशनकार्डवर त्याची नोंदणी करून घेतलेली नाही, असे प्रकार असू शकतात. त्यामुळे ज्यांना केरोसीनचा पुरवठा होत आहे. त्या ग्राहकांनी तत्काळ गॅसनोंदणी शिधापत्रिकेवर करून घेण्याचे आवाहन शिंदे यांनी केले.