शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
5
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
6
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
7
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
8
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
9
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
10
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
11
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
12
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
13
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
14
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
15
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
16
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
17
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
18
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
19
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
20
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
Daily Top 2Weekly Top 5

मुर्शी चेक पोस्टवर स्थानिक वाहनचालकांना दुजाभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:34 IST

देवरुख : रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाट अवजड वाहनांसाठी बंद आहे. तब्बल दीड महिना झाला ...

देवरुख : रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाट अवजड वाहनांसाठी बंद आहे. तब्बल दीड महिना झाला तरी हा मार्ग मोकळा करण्यात आला नाही. आता केवळ हलक्या वाहनांची येथून ये-जा सुरू आहे. मुर्शी साखरपा येथे पोलीस चेकपोस्ट येथे सहाचाकी वाहने कोल्हापूरच्या दिशेने घेऊन जाण्यास पोलिसांकडून अटकाव केला जातो. मात्र, रात्री पैसे घेऊन काही वाहने सोडण्यात येतात, असा आरोप स्थानिक वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

आंबा घाट येथे घाट वाहतुकीस बंद असल्याबाबत सूचना देणारे माहिती फलक किंवा कोणीही पोलीस कर्मचारी तैनात केलेला नाही. त्यामुळे बाहेरील मोठ-मोठी अवजड वाहने थेट मुर्शी साखरप्यापर्यंत बिनदिक्कतपणे येतात. साखरपा येथे घाटातून आलेल्या वाहनांवर केवळ जुजबी दंडाची कारवाई करून त्यांना सोडून दिले जाते. पाचशे रुपये दंड आकारून अवजड वाहने सोडली जातात. त्यामुळे स्थानिक वाहनांनासुद्धा मालवाहतुकीस परवानगी दिली जावी, अशी मागणी आहे.

तालुक्यातील चाळीसहून अधिक वाहनधारकांनी सोमवारी साखरपा पोलीस चेकपोस्ट येथे धडक दिली. जर अवजड मालवाहतुकीला परवानगी देण्यात आली नाही, तर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी संगमेश्वर तालुका शेतकरी लाकूड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किरण जाधव, उमेश गांधी, योगेश चव्हाण, ओंकार सुर्वे, महेश पाटील, योगेश केतकर, राजन मोहिरे यांच्यासह साखरपा, देवरूख विभागातील वाहनधारक उपस्थित होते.

200921\343855161735-img-20210920-wa0033.jpg~200921\34385517img-20210920-wa0034.jpg

फलक मुर्शी~या सारखी अनेक अवजड वाहने साखरपा येथे पोलीसांकडुन 500रुपये जुजबी दंड घेऊन सोडुन दिली