शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

फिटनेस फंडा : उत्साह वाढवा, उन्माद नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:22 IST

आरोग्यदायिनी प्रयोगशीलता, यातून तो हमखास खात्रीचे मार्ग दाखवतो. त्यावर नियंत्रण करणं, त्याप्रमाणं व्यक्तिगत, सामूहिक आणि देशिक वर्तणूक अत्यंत महत्त्वाची ...

आरोग्यदायिनी प्रयोगशीलता, यातून तो हमखास खात्रीचे मार्ग दाखवतो. त्यावर नियंत्रण करणं, त्याप्रमाणं व्यक्तिगत, सामूहिक आणि देशिक वर्तणूक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. नुकतीच जागतिक आरोग्य संघटनेनं कोविड-१९ संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली आहे. तो सर्वांना ‘सावधगिरी’ साठीचा इशारा आहे. या संभाव्य धोक्यातून सर्वसामान्यजन जास्त भरडला जात आहे. त्यानं कशी काळजी घ्यावी, एकीकडं राजकीय घडामोडीच्या वातावरणात गर्दी नियंत्रणाचं तंत्र सुटतं. दुसरं धार्मिक श्रद्धांच्या अंतरंगात गावाकडं धाव घेणं, तिसरं खेळांच्या मैदानात प्रेक्षकांचा उन्माद वाढून गर्दी करणं, या सर्व गोष्टी प्रशासनाच्या आणि आयोजकांच्याही हाताबाहेर, नियंत्रणाबाहेर जातात. अर्थात, या सर्व गोष्टी जनजीवनातील सर्वश्रेष्ठ श्रद्धा, विश्वास, सामूहिकता, अस्तित्व, संस्कार, आदरभाव, अर्थप्राप्ती, अर्थगुंतवणूक आणि जीवनातलं चैतन्य टिकवून ठेवण्यासाठी आवश्यकच असतं, हे निर्विवाद सत्य आहे. त्यात मानवीय सामुदायिक आरोग्याचा ‘एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या सामुदायिक निर्मितीक्षम मानसशास्त्राचा सिद्धांतही आहे. तो जपायलाच हवा. मात्र, त्याच वेळेस आपल्या अस्तित्वाला सुरक्षिततेचा मुलामा देणाऱ्या आणि आपल्या आरोग्य संरक्षक यंत्रणाची जी आपला जीव धोक्यात घालून आपलं जीवन सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करते. त्यात त्यांना सारासार विवेकशक्ती वापरून, बऱ्याचदा ती गर्दीच्या मानसशास्त्रात हरवूनच जाते, ती जपायला हवी. त्यामुळं आपलं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या समुदायाचं अस्तित्व, आरोग्यमय रीतीनं जपलं जाईल.

या गर्दीच्या मानसशास्त्रात सर्वसामान्यपणे सामान्य माणूसच अगोदर भरडला जातो. कारण तोच आपल्या गरजेनुसार, क्षणभराच्या संवेदनशील भावनेनं गर्दीच्या त्या क्षणिक क्षणात सहभागी होण्यास उन्मादक अवस्थेत सहभागी होतो. त्यालाही बरीच मानसशास्त्रीय सामुदायिक कारणं आहेत. बऱ्याचदा लॉकडाऊनमुळं त्याला जीवनावश्यक वस्तू मिळू शकत नाहीत. त्यामुळंही तो गर्दी करतो. अर्थात, संसर्ग कोविड-१९ ची साखळी तोडण्यासाठी आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा संसर्ग टाळण्यासाठी प्रसंगी हा तोडगाही अपरिहार्य भाग ठरतो. म्हणून सर्वांनी सर्वप्रथम १) गर्दी करू नये. शासकीय नियम पाळावेतच तेच आरोग्याचा हमखास हमी देणारे आहे. सुरक्षित अंतर ठेवावंच ठेवावं. २) लसीकरण मोकळ्या मनानं करून घ्यावं. ३) मुखनासिका पट्टी (मास्क) वापरावी. ४) हात वेळोवेळी स्वच्छ धुवावेत. ५) तपासण्या करून घ्याव्यात. शंकेला वाव ठेवू नये. ६) कुठंही थुंकू नये. ७) पाणी उकळूनच प्यावे. ८) अनावश्यक प्रवास करू नये. ९) या सर्वांचा सर्वसामान्य जनांवर आणि शासनावरही आर्थिक ताण येतो. अर्थव्यवस्था मजबूत राहावी, यासाठी आपण काटकसरीचं तंत्र जे या काळात शिकतो आहोत. तो पाळावा. काही महिन्यांची ‘दक्षता’ आपल्या सर्वांना ‘स्वस्थता’ प्रदान करणार आहे. कारण आपण आरोग्यसमृद्ध राहू, तर सगळं छान होणारच आहे. कारण जगात चांगलं घडणं, ते अनुभवणं हाच तर आरोग्याचा फिटनेस फंडा आहे.

-डॉ. दिलीप पाखरे, रत्नागिरी