लांजा राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे रेल्वे प्रवाशांना पदार्थांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:26 IST2021-07-25T04:26:23+5:302021-07-25T04:26:23+5:30

लांजा : तालुक्यातील विलवडे रेल्वे स्थानकामध्ये थांबविण्यात आलेल्या नेत्रावती एक्सप्रेसमधील प्रवाशांना लांजातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे फळे व बिस्कीट ...

Distribution of food items to railway passengers by Lanza Nationalist Congress | लांजा राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे रेल्वे प्रवाशांना पदार्थांचे वाटप

लांजा राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे रेल्वे प्रवाशांना पदार्थांचे वाटप

लांजा : तालुक्यातील विलवडे रेल्वे स्थानकामध्ये थांबविण्यात आलेल्या नेत्रावती एक्सप्रेसमधील प्रवाशांना लांजातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे फळे व बिस्कीट पुड्यांचे वाटप करण्यात आले.

मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाल्याने अनेक रेल्वे स्थानकांवर गाड्या थांबविण्यात आल्या हाेत्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले होते. विलवडे रेल्वे स्थानकावर नेत्रावती एक्स्प्रेस ही गाडी ८ तास थांबविण्यात आल्याने त्यातील प्रवाशांचे अन्नपाण्यावाचून हाल झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मिळाली. या कार्यकर्त्यांनी विलवडे रेल्वे स्थानकावर जात ८ तास अडकून पडलेल्या रेल्वे प्रवाशांना फळे व बिस्कीटांचे वाटप केले.

या मदतकार्यात जिल्हा सरचिटणीस अभिजित राजेशिर्के, लांजा युवक तालुकाध्यक्ष बाबा धावणे, शहर युवक अध्यक्ष दीपक शेट्ये, विद्यार्थी जिल्हा सचिव अनिकेत शेट्ये, दाजी गडहिरे, सोहेल घारे सहभागी झाले होते.

Web Title: Distribution of food items to railway passengers by Lanza Nationalist Congress