शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
3
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
4
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
5
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
6
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
7
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
8
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
9
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
10
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
11
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
12
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
14
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
15
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
16
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
17
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
19
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
20
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आगवेत एस. टी. घसरुन १६ प्रवासी जखमी

By admin | Updated: September 21, 2014 00:51 IST

मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डेजवळील घडला

सावर्डे/चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डेजवळील आगवे गावी भरधाव वेगाने जाणारी पुणे-देवरुख गाडी घसरुन अपघात झाला. या अपघातात १६ प्रवासी गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी पहाटे ४.३० नंतर घडला. मुंबई-गोवा महामार्गावर देवरुख आगाराची पुणे-देवरुख ही गाडी (एम एच १४ बीटी २९९४) नेहमीप्रमाणे देवरुखकडे जात असता आगवे येथील पॅसिफिक हॉटेलजवळ चालकाला डुलकी आल्याने व गाडी भरधाव वेगाने असल्याने रस्त्याच्याविरुद्ध बाजूला ४० फुटापेक्षा जास्त खोल दरीत कोसळली, असे पोलिसांनी सांगितले. या अपघातात एस. टी. बसचे २ लाख रुपयांचे नुकसान झाले. एस. टी.ने २ ते ३ वेळा उलटल्याने प्रवासी जखमी झाले. १६ प्रवाशांना डेरवणच्या वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. जयश्री रामचंद्र झोरे (२९ नायरी), गंगाराम नारायण पांचाळ (७२, कोसुंब), सुनिता गंगाराम पांचाळ (६२, कोसुंब), धोंडू तुकाराम सावंत (६५, पाचांबे), यशोदा विजय नरोटे (४८, साडवली), शामल सुरेश पिंगळे (३८, पडवे), कमलाकर अनंत पांचाळ (४५, माखजन), प्रदीप सीताराम घडशी (२८, आंबेड), सविता प्रदीप कदम (३५, अंत्रवली), मानव प्रदीप कदम (९, अंत्रवली), नसरीन उस्मान खान (३३), उजमा उस्मान खान (२०), अफरीन तन्वीर मुल्लाजी (२० तिघेही शास्त्रीपूल संगमेश्वर), जनाबाई शांताराम बोडेकर (६५, देवरुख), एस.टी.चालक राजेंद्र बाळ हवालदार (४१), वाहक सचिन रामचंद्र मगदूम (३३ दोघेही देवरुख आगार) यांच्यावर वालावलकर रुग्णालयात तातडीने उपचार सुरु करण्यात आले. दुपारपर्यंत ४ जखमी प्रवासी घरी गेले. उर्वरित प्रवाशांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. अपघात झाल्यानंतर पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी, वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी मदतीला दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. एस. टी. महामंडळाच्यावतीने चिपळूण आगारप्रमुख एस. बी. सय्यद व स्थानकप्रमुख राजेश पाथरे यांनी घटनास्थळी भेट देऊन सर्व जखमींना तातडीची मदत दिली. शिवाय औषधोपचाराचा सर्व खर्च एस.टी. महामंडळच करणार आहे. चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.(प्रतिनिधी)